मी ओट्यावर ठाण मांडून बसून राहायचे संपूर्ण वड्या तय्यार होई पर्यंत लहान असतांना आणि सतत आईला प्रश्न "झालं का?" दे ना थोडं". एक वाटी घेऊनच बसले असायचे मी आणि प्रत्येक स्टेज चाखायचे वडीची. त्यामुळे अगदी मध्यरात्री उठवून दिली तरी मी खाईन इतकी मला ती वडी आवडते. किंबहुना आवडते च्या पलीकडे आहे ते प्रेम. अनेक वैविध्य प्रकारच्या वड्या चाखल्या आत्ता पर्यंत मी, घरच्या, दारच्या, माझ्या हातच्या. पण आज जे चाखलं ते ह्या जगा पलिकडल होत.
जश्या मला ह्या वड्या आवडतात तसेच अनेक पदार्थ देखील आणि त्यात चहा पण आलाच. आणि मी बासुंदी चहा हा बोर्ड जेव्हा पासून बघितला आहे तेव्हा पासून मला चव घ्यायची फारच इच्छा आहे, पण मुहुर्त मिळत नाही आहे.
आज मी एका मिटिंग मधे चहा घेतला. एक घोट प्यायल्यावर मला जरा वेगळेपण जाणवलं. मग थोडे अजून घोट घेतले तर लक्षात आलं कि हा तर नारळाच्या वड्या च्या चवीचा फ्लेव्हर्ड चहा आहे. वा वा. एका दगडात दोन पक्षी. अहाहा. ह्या आधी कधीही म्हणजे कधीही मी असा चहा घेतला नव्हता. मज्जा आली फारच. जी कुठली चहाची पावडर, मसाला, ई. वापरला होता तो भन्नाट होता. अहाहा. लगेच थोडीशी पुडीत बांधून दे पावडर असं म्हणावसं वाटलं पण नाही मागितलं कारण ते अनोळखी ठिकाण होतं. त्या मुळे पुन्हा एकदा संपूर्ण नारळवाडी तय्यार करण्याच्या आठवणी डोळ्या समोरून गेल्या माझ्या.
शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१
ओल्या नारळाच्या वड्या
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा