गेले दोन एक वर्ष एक नवीन सहज आणि दररोज वापरायचं साधन म्हणजे श्रावक. मला जास्त न भावलेला असा तो, कारणं अनेक आहेत. ह्या नवीन दिवसात इतकं सगळं शिकायचं होत, सांभाळायचं होत, जपायचं होत कि ह्या श्रावक का कडे जास्त लक्ष गेलं नाहीच. पण सध्या मला प्रकर्षाने काही गोष्टी जाणवत आहेत. एक म्हणजे आधी श्रावक हे फक्त ऐकण्या बोलण्याचे साधन होते. म्हणजे तुम्ही जे बोलता ते समोरच्याला नीट ऐकू यावं आणि त्याने जे बोललं ते फक्त तुम्हाला / ऐकणाऱ्याला कळावं, असं काहीस. बाकी घरच्यांना / आजूबाजूला असलेल्यांना त्रास न होता. घरूनच काम जास्त प्रमाणात वाढल्यामुळे विविध गोष्टी ऍड झाल्या ह्या श्रावकामधे आणि त्यात एक म्हणजे तुमच्या आजूबाजूचा आवाज फिल्टर होऊन पुढे जातो. पण सगळेच हेड फोन्स फिल्टर करत नाहीत आवाज. तो हेड फोन एकदा परिधान केला कि वापरणाऱ्याला वाटत कि फक्त तो जे बोलतोय तेच समोरच्याला ऐकू येत. पण असं नाही ना, सगळं मागे / आजूबाजूला चाललेलं ऐकू येतंच. त्यात सगळे माझे विद्यार्थी स्वयंपाक घरातच का क्लास करता बसतात हे मला पडलेलं भलं मोठं कोडं आहे. आणि घराचे पण इतके महान कि क्लास सुरु असतांना गप्प बसत नाहीत, काय काय आवाज ऐकू येतात. गम्मत येते असं म्हणणार नाही मी पण थोडीशी करमणूक होते माझी. असो. "आलीया भोगासी असावे सादर". त्यामुळे ह्या माझ्या शिकलेल्या सावरलेल्या आज च्या पिढीतल्या माझ्या विद्यार्थ्यांना एकच विनंती ती म्हणजे जमल्यास शांत ठिकाणी बसा, गर्दीच्या नको, घरच्यांना पण आता हे सगळं अंगवळणी पडलं असेलच, त्यांना पण सांगा कि वर्ग सुरु असतांना आवाज कमी करा अथवा नकोच शक्यतो. फक्त वर्गापुरतं नाही हे, उद्या तुम्हाला जर एखादि मुलाखत द्यायची असेल, महत्वाची मीटिंग असेल तर हे चांगलं दिसत नाही.
तंत्रज्ञान आपल्यासाठी तय्यार आहे आणि फार उपयोगी पण आहे, पण ते कटाक्षाने पाळा, त्याचे पण नियम असतात हे लक्षात घ्या आणि मग बघा त्याचा सदुपयोग किती आनंद देऊन जातो ते. अर्थात हेड फोन तय्यार करणारी टीम पण कार्यरत आहेच आणि अजून नवीन पद्धतीचे प्रॉडक्ट्स येतील देखील बाजारात लवकरच पण तो वर जपून.
शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१
श्रावक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा