अनेक वर्षांपासून माझं एक तीक्ष्ण निरीक्षण आहे जे सगळ्या स्त्री वर्गाला लागू आहे. आमच्या कडे काम करणाऱ्या मावशीनं पासून ते माझ्या बरोबर काम करणाऱ्या माझ्या मैत्रिणी पर्यंत, किंबहुना वर्तमानपत्र आणि विविध लेखांद्वारे मोठ्या हुद्द्यावर असलेल्या स्त्रियांची पण तीच कथा थोड्याफार फरकाने. असो.
मला असं बघण्यात आलं आहे कि विद्याविभुषित / उच्च विद्याविभुषित नोकरी करणारी मुलगी लग्न होऊन सासरी आली, आई झाली कि तिची घालमेल आणि कुतरओढ सुरु होतेच, न कळत. अनेक दगडांवर पाय ठेवायचे म्हणजे तारेवरची कसरतच तिची आणि अर्थातच तिच्या बाळाची / बाळांची. काय धर-सोड करायचं समजत नाही, अर्थात निर्णय घेते ती, पण घालमेल सदाची असतेच. स्वतःच्या मुलाला / मुल्लांना एकटं सोडून कामावर जायचं, घरी-दारी सतत सिद्ध करायचं अवघड होत. पण ती करते सगळं सातत्याने. काही कुटुंबामधे त्या उपर तिला हे पण ऐकून घ्यावं लागत कि १. कोणी सांगितलंय नोकरी करायला, सोड ताबडतोब २. बाकी जगातल्या सगळ्या स्त्रिया नोकरी आणि कुटुंब दोन्ही सांभाळतात हसत-खेळत मग तुलाच कसं जमत नाही. ई. म्हणजे "तबला हि माझा आणि डग्गा पण".
नेहेमी मला एक प्रश्न भंडावून सोडतो जेव्हा मी आपले चार पायांचे मित्र / पाळीव प्राणी रस्त्यावर मालकासोबत फिरतांना बघते तेव्हा. ह्या चार पायांच्या लेकराचं घरी करतं कोण? दोघेही जर नोकरी करणारे, त्यांचीच मुलं पाळणाघरात ठेवून पळणारे, आणि स्वतःच्या मुलांचं संगोपन करण्यासाठी नोकरी करणारी आई / स्त्री घरी राहणं म्हणजे एक प्रकारचा गुन्हा. मग ह्या चार पायांच्या मुलांसाठी घरची स्त्री सगळं सोडून राहू शकते? बाप रे, हे जर खरं असेल तर हे फारच विदारक सत्य आहे. अनेक प्रकारची बाळ सांभाळतो आपण आपली दोन पायांची, चार पायांची, हिरवी झाडं ई. आपल्या बाळांना अगदीच गरज पडली किंवा शिस्त म्हणून एखादवेळा रागावणं किंवा फटका देणं करू शकतो, पण बाकी बाळाचं काय?
असो, हा जरी ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी देखील मला असं (चुकीचं) का जाणवत आहे कि चार पायांचे जास्त महत्वाचे, त्यांच्यासाठी सगळं माफ, त्यांच्यासाठी आई सहज घरी राहू शकते कदाचित.
कितीही पायांची असो आई सगळ्यांची तितक्याच प्रेमाने काळजी घेते हे च सत्य आणि बहुतांशी तीच सगळ्यांसाठी उपलब्ध पण असते नेहेमीच. "संपूर्ण आई वर्गाचा विजय असो".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा