आज मी देवाला पुन्हा एकदा मनापासून हात जोडले, अगदी मनापासून होतं ते. का? सांगते.
ज्या माणसाने / टीम ने हि मोबाईल नावाची वस्तू ह्या जगात आणली आहे त्याला सद्बुद्धी दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. मोबाईल विकसित केल्या बद्दल अजिबात नाही, पण तो ज्या स्वरूपात विकसित झाला आहे त्या करता. धन्य आहेत ते बुद्धिजीवी आणि त्यांची विचार करण्याची क्षमता, अनेक पिढ्या पुढे काय करू शकतील हे आधीच कृतीत आणल्याबद्दल / गृहीत धरल्याबद्दल.
बहुतांशी सगळेच मोबाईल धारक स्वतःला एखाद्या देशाचा पंतप्रधान किंवा त्या उपरचं समजतात, अजिबात एक कण त्याच्या खाली नाहीच. जेव्हा फोन येतो तेव्हाच जर उचलला नाही तर कदाचित हि पृथ्वी थांबेल काम करणं, असा त्यांचा ग्रह असतो. आणि म्हणूनच गाडी चालवतांना, रिक्षा चालवताना, स्वयंपाक करतांना, जेवतांना ई. कान आणि खांदा ह्यांचा पुरेपूर उपयोग / सदुपयोग करून घेतला जातो. आताशा काही जण नवीन दागिना (इअर प्लग) परिधान करायला लागले आहेत आणि तो सतत गळ्याभोवती असतोच. पण अनेक जणांकडे नसतो तो, मग काय? उचला खांदा आणि लावा कानाला.
बरं झालं देवा मोबाईल गोल आकाराचा, त्रिकोणी आकाराचा किंवा शष्ट / अष्ट कोनी नाही तय्यार करायला सुचवलंस नाही तर ह्या सगळ्या मल्टि टास्कर्स च काय झालं असत कोणास ठाऊक.... हा फक्त विचार करून आणि डोळ्यासमोर ते दृश्य उभं करूनच मी हबकले. इतकी वर्ष सातत्याने योग गुरु सांगून दमले मान इकडे तिकडे फिरवा, खांदे वर खाली करा, पण छे, सपशेल ऐकलं नाही कोणी. बघा हा मोबाईल कशी कसरत करून घेतोय ते. अहाहा. बघावं ते नवलच.
#mobile #mobileholdingstyle #earsholder #bentneck #multitasking #whiledriving #whileeating #whilecooking #yoga #designofmobile #roundmobile #hexagonshape #pentagonshape
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा