रविवार, १९ सप्टेंबर, २०२१

घर आणि बदल

आज मी माझ्या एका सहपाठी च्या घरी जेवायला गेले होते. त्यांचं एवढ्यातच म्हणजे २-३ वर्षांपूर्वी लग्न झालेलं आहे आणि असं म्हणायला हरकत नाही कि राजा-राणी चा छोटेखानी संसार नुकताच सुरु झाला आहे. त्या प्रमाणे त्यांच्या कडे सगळं सुरवातीला असतं तसंच सगळं तात्पुरतं किंवा दोघांपुरतं, साधं, बैठं असं सगळं होत. भव्य दिव्य नाही. मला आमच्या दोघांच्या पहिल्या घराची प्रकर्षाने आठवण आली, सगळं झर्रकन उभं ठाकलं डोळ्यासमोर आणि काही क्षण तर मी नव्हतेच तेथे असं म्हणायला हरकत नाही. मग आम्ही कशी हळू हळू सामानाची जुळवा जुळव केली, भव्य-दिव्य कडे वाटचाल सुरु झाली कि थोडेसे बदल झाले. एक तर आम्ही दोघांचे चार झालो आणि भारतात पुण्यात आलो. आता दोघे पिल्लू अगदी रांगत्या किंवा नुकत्याच चालत्या वयाचे होते त्यामुळे पुन्हा संपूर्ण घर आधी भाड्याचं म्हणून आणि त्यानंतर स्वतःच झालं तरी दोघे छोटे म्हणून मोकळंच. पडतील, कोपरा लागेल, खराब होईल ह्या सगळ्या विचारातून फर्निचर वगैरे जास्त घेतलं गेलं नाहीच, किंबहुना टाळलं. दोन्ही घरात आधी फक्त भारतीय बैठक ठेवली होती.  मुलं जाणती आणि थोडी मोठी झाली म्हणून नवीन फर्निचर, रंगरंगोटी केली आणि त्यानंतर अजून मोठ्या घरात राहायला गेलो.

"चेंज इज द ओन्ली कॉन्स्टन्ट" हेच खरं आहे. हेच सततचे बदल कदाचित सर्वांना नवीन शक्ती, प्रेरणा आणि उत्साह देण्याचं काम करतात.

आम्ही दोघे होतो ते आज हा इतका मोठा पल्ला आणि त्यात अनुभवलेले बैठकीचे बदल भावून गेले, प्रचंड शिकवून गेले मला.
बाहेरील देशातील भारतीय बैठक ते भलं मोठं फर्निचर, ते पुन्हा आपल्या देशाची भारतीय बैठक ते साधे आणि भले मोठे फर्निचर हे उतार-चढाव / रोलर कोस्टर राइड्स अप्रतिम. परप्रांतातली आणि इथली भारतीय बैठकीमुळे झालेला व्यायाम असो, किंवा नरम सोफ्याने दिलेले जगावेगळे सुख असो, सगळंच आनंदाने मनापासून उपभोगा. ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...