मी जेव्हा शाळकरी मुलगी होते तेव्हा पासून घरी अंगणात छान मोठा बगीचा होता. तो मी पण सांभाळायचे, कारण १. लाल चुटुक पेरू, २. वालाच्या शेंगा, ३. चाफा, ४. मोगरा ५. उन्ह्याळ्यात पिटुकले कलिंगड ई. कोणीतरी माझ्या बाबांना एक झाड बक्षीस म्हणून का एका समारंभात दिले होते. त्याला तेव्हा लहान असल्यामुळे काही छोटीशी हिरवीगार पाने होती फक्त. त्यानंतर त्याला एक अतिशयच वेगळ्या पद्धतीचं लाल चुटुक फुल आलं ज्यात मधे एक पिवळसर रंगाचा तुरा पण होता, जास्वंदाच्या फुलात आढळतो तसा. जेव्हा एकामागून एक तशी ती अनोखी फुलं यायला लागली तसा माझ्या आनंदाला पारावर राहिला नाहीच. थोड्या दिवसांनी लक्षात आलं कि खरं तर ती फुलं नव्हतीच, ती लाल रंगांची पान होती. ते त्या झाडाचं वैशिष्ट्य, हिरव्या गार पानांवर लाल चुटक पान आणि तुरे. पण दुरुन बघितलं तर फुलं, किंवा त्या बद्दल माहित नसलं तर फुलांचं शोभेचं झाड. अहाहा. क्या बात है नाही?
"चकाकणारे सर्व सोनेच असते असे नाही", हि म्हण मला प्रकर्षाने जाणवली आणि आठवते देखील जेव्हा जेव्हा मी पॉईन सेशिया किंवा Anthurium ऍन्थुरियम नावाचं हृदयाच्या आकाराचं पान असलेलं झाड बघते. अर्थात बरंच ह्या झाडांबद्दल वाचल्यानंतर समजलं कि हवाई आणि इतर जगाच्या भागात ह्या झाडांपासून लग्नात सजावट करतात किंवा पुष्प गुच्छ तय्यार करतात.
एकदा व्यक्ती जेव्हा मोठा होऊन विद्यार्थी दशेत, नोकरदार / व्यावसायिक म्हणून समाजात वावरतो तेव्हा अनेक लोकांशी संपर्क येतोच, सर्वांसोबत काम करावं लागत, राहावं लागत ई. त्या वेळी अनेक जण कळत न-कळत तुम्हाला वेगळ्या स्वरूपात बघतात, समज - गैरसमज करून घेतात, कधी ते प्रोत्साहन असतं तर कधी मागे खेचणं. प्रत्येकाला स्वतःबद्दल सगळी कल्पना असते, आपण काय आहोत हे माहित असतं, आपल्या कामाची पद्धत आणि विचारपूर्वक केलेली कृती प्रामाणिक असते, मग दुनिया बोलू दे ना काय बोलायचं आहे ते? त्यांना "पॉईन सेशिया" ला फुल म्हणू दे नाहीतर पान, ते झाड बहरायचं थांबत का? ते झाड बाकीच्या बघणाऱ्यांना हिरमुसलं करत का? नाही ना? मग बुद्धिजीवी माणसानेच का आपल्या वर्तनात बदल घडवून आणायचा केवळ कोणाच्या तरी बोलण्याने. प्रयन्तपूर्वक ह्या वर सातत्याने काम करायला हवं. आणि सतत चित्ती ठेवावे समाधान.
"All that glitters is not gold", even if you are totally independent personality but some people look at you as totally dependent. Chill, its their problem, they need to change their spectacles, right. Let them stay with their misunderstanding, wrong impressions etc. provided you are totally aware about your good-deeds and clear intentions. Learn to live with it, like red the leaf tree Poinsettia = not flower, but it looks like flower and it never complains for its true existence, isnt it? So enjoy, have fun and move forward always.
URLs to know more about these couple of flowers / plants, click following links:
https://extension.umn.edu/houseplants/poinsettia
https://www.guide-to-houseplants.com/anthurium-plant.html
#poinsettia #anthurium #plants #flowers #personalities #individuals #misunderstandings #deeds #good-deeds #glitter&gold #leaf #hawaii
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा