मी अगदी लहानपणीपासून पक्षांच्या, आपाल्या पक्षी मित्रांच्या गोष्टी ऐकून मोठी झाले आहे. जरी त्या फक्त गोष्ट होत्या, तरी मी मोठी होत असतांना असंख्य वेळा पक्षांच्या उपयुक्ततेची महती ऐकली आहे. अनेक संशोधक कित्येक वर्षे ह्या विषयावर संशोधन करत आहेत. त्यांच्या लेखात सुद्धा अनेकदा विविध जातीच्या पक्षांबद्दल लिहिलं गेलं आहे. मानवजातीला पक्षी हे वरदान आहेत. अनेक वृत्तपत्रांच्या लेखात देखील हे आढळेल. काही ठराविक लिंक येथे देत आहे. अनेक हिंदी, इंग्रजी चित्रपटात देखील पक्षांबद्दल बोलले गेले आहे. मूकप्राणी आणि त्या मनानी आकाराने लहान, वयोमान कमी असे असून देखील प्रत्येक जात आपल्या ला मदत करत असते सातत्याने, गेल्या अनेक पिढ्या, अनेक वर्ष सलग.
घरात अगदी छोटासा मिठू जरी असला तरी घरचं वातावरणचं बदलून जातं. तो अगदी घरचा सदस्य असल्यासारखा असतो, राहतो. माझ्याकडे दोन पोपट होते म्हणून मी ते सगळं अनुभवलं आहे.
मला दररोज पक्षीच साद घालून पहाटे जागं करतात. मी फारच भाग्यवान आहे कि आमच्या घरच्या आजूबाजूला अनेक बहुउपयोगी झाडे आहेत. त्यामुळे पक्षांची सकाळ संध्याकाळ शाळा भरते, विविध सण साजरे होतात, लग्न कार्य होतात, लग्न कार्याची लगबग अनुभवता येते, मग पिटुकले नवे पिल्लं जन्म घेतात आणि अत्यानंद देऊन जातात, परंपरा सुरु ठेवतात. माझ्या आजारपणात देखील मी आधी अनेक लेखात लिहिल्या परिमाणे पक्षांनी मला खूप साथ दिली. त्यांना कसं काय जाणवलं कुणास ठाऊक कि मला त्यांची अत्यंत गरज आहे ते. त्या छोट्याश्या जिवांना माझ्या डोळ्यातले ठरलेले पाणी दृष्टीस पडले म्हणजे महद आश्चर्यच.
अश्या माझ्या सारख्या पक्षी प्रेमीला जर हे वाक्य "पक्षांनी कधीही गरिबांना एकत्र येऊ दिले नाही" वाचायला मिळालं वर्तमान पत्रात तर प्रचंड दुःख होणारचं ना? काय हे, लिहिणाऱ्याच्या जिभेला काही हाडं? असं कसं शक्य आहे. आणि हा मथळा वाचूनच मी इतकी अवाक झाले कि संपूर्ण बातमी वाचविशीच वाटली नाही. पण मग माझा छोटासा मेंदू मी वापरला आणि सद्य स्थितीचा विचार केला तर वाटलं कि हा लिहिणारा कदाचित राजकीय पक्ष्यांबद्दल बोलत असावा. आणि जर तसं असेल तर स्पष्ट लिहावं ना मग, हे काय पक्षांनी गरिबांना ...
मी काही वार्ताहार नाही का त्या क्षेत्रातली तज्ञ् नाही पण इतकी साधी मूलभूत गोष्ट तर नक्कीच समजते मला. संदिग्ध किंवा अर्धवट का लिहायचं बरं? किंवा लोकांना समजेलच किंवा ते समजावून घेतीलच हे गृहित का धरायचं? ह्याला पत्रकारिता म्हणत नाहीत माझ्या दृष्टीने. आणि त्या वर ज्याने हा लेख छापण्यापूर्वी तपासाला असेल त्याचं काय? माझ्या मते एक नाही, दोन नाही, तीन किंवा जास्त तज्ज्ञांकडून लॆख / लिखित गेल्याशिवाय छापत नाहीत म्हणे? आश्चर्यच आहे.
https://divyamarathi.bhaskar.com/news/what-is-the-significance-of-birds-in-our-lives-126871414.html
https://www.lokmat.com/maharashtra/importance-birds-biodiversity/
https://maharashtratimes.com/editorial/article/save-the-birds-save-the-humans/articleshow/74211269.cms
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा