गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

तांदूळ


गेले काही दिवस किंवा महिने म्हणा आमच्या घरी एक नवीन वारं वाहतं आहे, ब्राउन राईस नावाचं. बदल हाच स्थिर आहे ह्यावर माझा दृढ विश्वास असल्यामुळे आणि मी दररोज च्या जेवणात भात खात नसल्यामुळे मी तो सहज करायला सुरवात केली. ह्यांना आवडतो ना, गरजेचं आहे ना मग चला तर पुढे. तो भात शिजायला जरा जास्त वेळ घेतो नेहेमीच्या पांढऱ्या तांदळापेक्षा. म्हणजे अगदी कुकरला लावा नाहीतर भांड्यात शिजवा वेगळा तो वेळ घेतोच हे प्रकर्षाने जाणवलं. थोडसं डोकं लावलं तेव्हा समजलं कि पांढरा म्हणजे पॉलिश केलेला, वरचे थर काढून तयार केलेला असा. त्यामुळेच तो पट्टाकिनी शिजतो हो. 


ह्या छोटयाश्या अनुभवावरुन एक सहज जाणवलं कि प्रत्येकाने अगदी असेच राहावे प्रतिदिनी. जेव्हा हवे तेव्हा थर पांघरावे. नाण्याच्या दोन बाजू इथे देखील निदर्शनास येतात. एक म्हणजे गेंडा कातडी व्हावे गरजे नुसार आणि काही म्हणजे काही अंगाला न चिटकू देता पुढे मार्ग क्रमणा करत राहावी. आणि दुसरे म्हणजे विविध गूण संपादन करत राहावे, शिकावं, नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्यात, व्यक्तिमत्व बाहेरून जाईल असे नेहमीच पाऊल उचलत राहावीत आणि त्याचे थर पण भार नाही असे मार्गस्थ होत राहावे. ह्या मुळे स्वतःला अत्यानंद होतोच, अनुभवामृत चाखायला मिळते आणि तुमच्या आदर्शांवर बाकींना पण मग मार्ग दिसतो. 


अजून एक कंगोरा असा कि हवं तेव्हा थर काढून पण टाकता आले पाहिजेत. आजची पिढी त्याला अन लर्निंग असे संबोधते. नको ते झटकून टाका पट्टाकिनी आणि पुढे मार्ग स्वच्छ मोकळा निर्मळ असा तय्यार होतो. असे नको असलेले थर काढून टाकले कि अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी, गमती, आत्मसात करण्यास सुकर जातं, अगदी त्या पांढऱ्या तांदळासारखे. 


बघा म्हणजे ते इतके बारीक तांदुळाचे दाणे देखील मला कित्ती शिकवून गेले आज. अर्थात आपण हे सगळं करतंच असतो सदोदित न कळत, पण आता कळते पाणी करा, थोडीशी मेहेनत घेऊन करा, करत राहा. एकदा करून भागणार नाहीच, सदोदित पुढे चालायचं म्हणजे सातत्य महत्वाचे. असे केल्याने मग अमृतानुभवची प्रचिती नक्की येईल.  

३ टिप्पण्या:

  1. असे कितीतरी थर घेऊन आपण वावरत असतो व्यवहारात. कोणत्या वेळी कोणता थर काढायचा व कधी ओरिजिनल लाल तांदळापासून सारखं राहायचं हे शिकायचं या दोन्ही तांदळापासून.

    उत्तर द्याहटवा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...