गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

प्रसिद्ध उपयुक्त म्हणी


शहाण्या माणसाने कोर्टाची आणि पोलिसांची पायरी कधीही चढू नये म्हणतात. मला ह्यात एक अजून ठिकाण जोडावंसं वाटतंय ते म्हणजे हॉटेल / रेस्टॉरंट्स. घरच्या अन्नाला तोडच नाही. अगदी अपरिहार्य कारणांमुळे किंवा अगदी क्वचित बाहेरचं खाणं ठीक पण शक्यतो नकोच. अगदी स्टार हॉटेल मध्ये तरी अनेकविध नियम, अटी लागू पडतात, पाळाव्याच लागतात त्यामुळे ते उत्तम दर्जाचे घटक पदार्थ वापरात असतील अशी आशा आहे. पण छोटी ठिकाणं म्हणजे जरा प्रश्नचिन्हच. काही अपवाद वगळता बाकींबद्दल न बोललेलं बरं. पैसे देऊन तब्बेत स्वतःच्या हाताने बिघडवून घेण्यात काय अर्थ आहे. आणि आधुनिक गुरु आणि त्याच्या संस्था पण सांगतात कि बाहेरचं खाणं टाळा, अनेक अर्थाने. त्यांच्या दुर्ष्टीने घरी जशी आई स्वयंपाक करतांना तिच्या मायेचा स्पर्श आणि मसाला त्यात मिसळतो, आशीर्वाद असतो आणि मनापासून इच्छा देखील कि हे अन्न सेवन केल्यावर माझ्या कुटुंबाला फायदा व्हावा, तब्बेती सुधृढ राहाव्यात ई. तसे बाहेर जे स्वयंपाक करतात, तुम्हाला वाढून आणून देतात त्यांना जर बरं नसेल, त्या वेळी भूक लागली असेल किंवा ते चमचमीत पदार्थ खायची इच्छा उत्पन्न झाली तर मग तो मसाला मिसळला जातो न कळत त्या अन्नात. त्याचे कदाचित परिणाम होतात खाणाऱ्यावर. हे एक महत्वाचे कारण आहे स्वच्छता आणि घटक पदार्थांशिवाय. 


मला एक सांगा, जे घरी, फ्लॅट मध्ये राहतांना सहज कुत्रा पाळतात, तो एक सजीव प्राणीच आहे. त्याला माणसापेक्षा जास्त वास टिपण्याचे इंद्रिय आहेत. तो एक घराचा सदस्य म्हणून राहतो किंबहुना त्याला तसे पाळले जाते, माणसासारखे. पण अनेक संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे कुत्र्यांना माणूस जेवतो ते अन्न चालत नाही त्यांचं स्वतःच वेगळं असतं आणि तेच द्यावं लागत त्यांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने. बंद, वातानुकूलित फ्लॅट मध्ये राहतांना त्या श्वानाला घरची सगळी मंडळी जेवत असतांना सुगंध येत असेल आणि खायची इच्छा देखील, साहजिक आहे. त्याचं वेगळं खाणं झालं असलं तरी देखील. आणि आपण टाळतो द्यायला. मग त्याची इच्छा नेहेमी होते त्याचं काय? 


प्रत्येक जणच घरी काम करणाऱ्यांना खाऊ पियू घालतातच असे नाही. आणि आजकाल तर कधीही कोणीही त्यांच्या वेळेनुसार खातात. मग ती पण हाडामासाची माणसेच आहेत ना. 


माझ्या मते ह्याचा पण परिणाम होत असावा. तेव्हा अगदीच गरज असेल तरच घरी पक्षी, प्राणी पाळा, त्यांना त्यांच्या कळपात राहू द्या. आणि घरच्या मावशींना कणभर द्याच आवर्जून. त्या देखील घरच्या सदस्य आहेतच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...