बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे...


आपल्या सर्वांसाठी, मानवांसाठी अनेक गोष्टींना महत्व आहे, आई वडील, नातेवाईक, मोठ्यांचा आदर, शिक्षण, समाजाचं ऋण, अर्थार्जन, योग्य विनियोग वेळेचा आणि पैश्यांचा सुद्धा ई. यादी फार मोठी आहे. माझ्या दृष्टीने ह्या यादीत सर्वात अग्ग्रगणी येते ते भोजन, अन्न. अन्नाचं महत्व अनन्य साधारण असेच आहे. जीवनाचे सार आहे. आग्रहण म्हणजे एक मोठी साखळी आहे, ज्यात शेतकऱ्याचे प्रचंड कष्ट, निसर्गाची कृपा, शारीरिक मानसिक आरोग्य ते अन्न तय्यार करण्यासाठी, पचवण्यासाठी आणि रिचवण्यासाठी देखील. शेतकरी ते स्वयंपाक घर ह्यात अनेक अजून व्यवसाय / व्यावसायिक येतातच. हे सगळे साखळीतले माणिकमोती सातत्याने राबत असतात तेव्हा चार घास लाभतात आणि सुख देऊन जातात. ह्याच साठी अगदी न कळत्या वयापासून, शाळेतच अन्नाचं महत्व समजावून सांगितले जाते, विविध प्रकारे. श्लोक पाठ आणि पठण करून घेतले जातात नियमित पणे, मग तो विद्यार्थी कुठल्याही माध्यमात, जगातल्या शाळेत जावो. मराठीत, इंग्लिश, आणि बाकी स्थानिक भाषेत तोच मतितार्थ असलेले शब्द / रचना असतात. मुलं अगदी तन्मयतेने ते म्हणतात देखील. 


शाळेत शिकवलेले, किंवा त्या कोवळ्या वयात शिकवलेले बाकीचे विषय म्हणे जन्मभर न चुकता लक्षात ठेवायचे कारण ते जगायला आवश्यक आहेत. जसे कि गणित, भूमिती, भूगोल, इतिहास, विज्ञान आणि इतर. 


माझ्या अनेक प्रसंगी मिळालेल्या / चाखलेल्या अनुभवातून एक समजलं आहे कि माणूस फार उच्च कोटींचा हुशार आहे. तो हवं ते हवं तेव्हा लक्षात ठेवतो किंवा विसरतो, किंवा तसे उपदेश करतो. विषय, त्यातली समीकरणे ई. लक्षात ठेवून वापरायची, मग अन्नाचे महत्व सांगणारा श्लोक किंवा त्यातला मतितार्थ का नाही? त्या अन्न पुरवठा साखळीतले कित्येक जणांचे अपार कष्ट कसे काय बाजूला सुरू शकता, विसरू शकता, अन्नाला उठता बसता, समोर आले कि सातत्याने नाव ठेवता आणि का? काय मिळतं असं करून? पैसे फेकलं कि सगळं मिळालं का? तर नाही.  हि उच्च कोटीच्या शाळेत गेलेल्यांची गत.


माझ्या मैत्रिणीचा नवरा म्हणायचा, जेव्हा ती त्याला विचारायची कि स्वयंपाक कसा झालाय ते, पानात मीठ, लोणचं, लिंबू का वाढतात? तर प्रत्येकाची चव, पातळी वेगळी असते. ज्याला जे हवं ते लावून घ्यावे. इतकं सोप्पं आहे ते. अन्नाविषयी नको ती चर्चा नको. अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरणं नोहे जाणिजे यद्न कर्म.  जे पेराल तेच उगवतं, ज्वारी पेरली तर ज्वारीचं मिळणार ना. अगदी तस्सेच, सातत्याने अन्नाविषयी कुरकुर केली कर ते तस्सेच लागणार चवीला. एकदा आणि नेहेमीच नतमस्तक व्हा आणि सेवन करा. त्या प्रत्येक घटकाला धन्यवाद द्या ज्यांच्या परम कष्टामुळे पुढ्यात आयतं सुग्रास मांडलंय, चारीठाव. कित्येक जण आहेत ज्यांना दिवसाला फक्त एक भोजन लाभतं. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...