माझ्या लहानपणी प्रचंड कडक शिस्त होती, प्रत्येक गोष्टीच ठिकाण ठरलेलं असायचं, आणि हो वेळ सुद्धा. कधीही काहीही चालायचं नाहीच. स्वयंपाक घरातच किंवा डायनिंग टेबल वर बसूनच जेवायचं, ई. "झोपायच्या ठिकाणी खायचं नाही, मुंग्या येतील" इति आई. तेव्हा अजून एक महत्वाचा दुवा होता तो म्हणजे हॉटेल, रेस्टॉरंट्स असे बाहेर हादडायचे पर्याय सर्रास उपलब्ध नव्हते. अगदीच बाहेर गावी ते देखील गाडीने / बसने प्रवासाला गेलो तर धाबे दिसायचे रस्त्याच्या काठी, किंवा चहाच्या टपऱ्या असायच्या, बास. उठ सुठ बाहेर खाणे खिजगणतीत नव्हतेच. त्यामुळे पण असेल कदाचित मुन्यांना घरीच खाद्य मिळत असावं. त्या वेळी साखर गोड होतीच आणि माणसांमधला गोडवा पण टिकून होता. कुणालाही साखरेचा बाऊ नव्हता. शारीरिक कामे, चालणे, घरकाम, अंगमेहेनत, बघीच्यातले काम, शेतीची कामे ई. मुळे असणार नक्कीच. आताशा मी स्वतः आई असून हे वाक्य वापरायची पुरती विसरूनच गेले. हा झाला एक भाग, का साखरेतला गोडवा कमी झालाय? ह्या कलियुगातील साखरेतला हो मंडळी. माझ्या मते कलियुगातील मुंग्यांना एकतर गगनचुंबी इमारतीमध्ये चढायला नकोसं होतं असेल. किंवा त्यांना देखील आता इतके पर्याय उपलब्ध आहेत अगदी देश विदेशातील मग तुमच्या कडचं मिळमिळीत घराचं, तेच ते सारखं कोण चाखणार हो? छे छे. सगळेच बदललेत, अत्याधुनिक झालेत, मग मुंग्यांनी तरी का मागे राहावं? मानव जर सर्रास स्मार्ट फोन वापरात आहेत तर ह्या मुंग्या पण स्मार्ट झाल्या असतील. आताशा त्या AI च्या मदतीने आधीच विचारपूस करून, पोटभर खाऊन लुप्त होतं असतील, सोशल मीडिया संलग्न काही वर वेळ व्यतीत करत असतील, आभासी जगाचा आनंद लुटत असतील. त्यामुळे मुंग्या लागल्या, साखर किंवा गोड पदार्थ उन्हात ठेवा असे काहीच कुठेच कानावर येत नाहीच माझ्या. मी तरी काही एअर पॉड, इअर प्लग्स, इअर फोन ई. पैकी काहीच वापरात नाही, कधीच. आणि हो स्क्रीन वर सुद्धा मोजक्या वेळी असते मी. जे अश्या यंत्रणा वापरतात सातत्याने, त्यांना ना दिसणार ना ऐकू येणार. काही तरी गोम आहे हे निश्चित. मुंग्यांसाठी पण "चेंज इज द ओन्ली कॉन्स्टन्ट".
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
मुंग्या येतात पण तू ज्या सोसायटी मधे रहातेस तीथे सगळे दारं बंद करून रहातात. त्यामुळे तुला त्यांनी घरात गच्चीत किंवा बाल्कनीत ठेवलेली ताटे तुला कशी दिसणार? आणि दुसरं कारण म्हणजे पुर्वी दारा पुढे अंगणअसायचे..
उत्तर द्याहटवाHo na
उत्तर द्याहटवा