मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

आभासी भेट


एक दिवशी गाडी चालवतांना अचानक एका वाहिनीवर खूप सुंदर रचना ऐकायला मिळाली. त्यात असं म्हटलं होतं कि "मीरे सारखी साद घातली तर श्री कृष्ण पण भेटीस येतो". इतकी आर्तता हवी, आपण वर वर आठवण करतो मग ती पोचणार कशी कोणापर्यंत?


माझ्या दृष्टीने दोन पद्धतींच्या आभासी भेटी असतात. एक म्हणजे मनःपूर्वक स्मरण ज्यात भावना, कंपन / व्हायब्रेशन्स अगदी नक्की पोचतात अगदी नैसर्गिक रित्या, प्रगतशील आर्टिफिशियल तंत्रज्ञान न वापरता आणि दुसरे म्हणजे विडिओ कॉल, किंवा सोशल मीडिया वापरून पाठवलेले निरोप. एखाद्या व्यक्तीची आठवण करून त्याची भेट सिम्यूलेट करणं, सदृशीकरण करणं म्हणजे एक आत्मिक भेट होय. तंत्रज्ञान विकसित होण्याआधी आणि आता देखील अशी भेट घडतेच. स्वानुभव घ्या नक्की. 


एकदा एक अनुभवामृत कानावर पडले सहज, ते येथे मांडते आहे. एक प्रयोगातून विज्ञान अशा पद्धतीने काही अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांना सदृशीकरण करायला सांगितले सूर्यनमस्काराचे. जे शारीरिक पद्धतीने सूर्यनमस्कार घालून फळ मिळवतात त्यांच्या मानाने आभासी पद्धतीने केल्यामुळे, असे त्यांनी पडल्या पडल्या डोळ्यासमोर मांडले, किंवा स्वतःला भासवले कि ते प्रत्यक्ष १२ आसने करत आहेत. थोडा जास्त अवधी लागला पण बहुतांशी सगळ्यांनाच फायदा झाला. प्रत्येक वेळी, प्रत्येक जणांना हे फायदेशीर ठरेलच असे नाही पण हा एक तरणोपाय आहेच. सरते शेवटी दुधाची तहान ताकावर, नाही का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...