शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

वरचा मजला शांत


त्या निसर्गाने मुलींना लांब, घनदाट आणि मोठे केस का अर्पण केलेत ह्याच गुपित आणि रहस्य मला समजलं, उमगलं काल, इतक्या वर्षांनी, दशकांनी सरतेशेवटी. माझ्या आई पासून मी न कळत निरीक्षण केलं आहे कि कमीतकमी दिवसातून दोनदा तरी त्या केसांवरून फणी फिरवली जातेच. काही जणी तीनदा फिरवायच्या एक चांगली सवय म्हणून ते रात्री झोपतांना, व्यवस्थित रक्त प्रवाह व्हावा, शांत झोप मिळावी हा त्याच्या मागचा उद्देश असावा कदाचित.  


पण दोनदा ह्या मागे फक्त व्यवस्थित दिसणंच नव्हतं तर त्या निमित्याने त्या टेकायच्या. सर्वत्र आणि सारख्या भागदौडीमधून काही क्षण काढता यायचे. व्यवस्थित बसून जर त्या केसांचा सांभाळ केला नाही तर अशक्य होतं त्यामुळे हक्काचे दोन वेळा बसने होतं होते. त्यावेळी बहुतांशी उभ्या उभ्या कसे तरी केस करण्याची पद्धत अंगिकारली नव्हती मुलींनी. कधी कधी मायलेकी, जावा जावा, शेजारणी बसून गप्पा पण होतं असतं. मी त्या वेळची गोष्ट सांगते आहे जेव्हा स्वतंत्र घरे होती, अंगण होते, आता नाही हे सगळं शक्य. एकतर मुली सगळ्याच घराची ओस ओलांडून घराबाहेर पडल्या आहेत. त्यामुळे हे असं शांतपणे बसून काही करणं शक्य नाही. त्यात आपल्या सर्वांसमोर अनेकदा राण्या साकारल्या जातात, मग ते चित्रपट असोत किंवा टीव्ही वरच्या सिरियल्स. अनेक दा प्रत्येकीच्या मनात येतेच कि आपल्याला पण अशी काहीशी / काही अंशी सेवा मिळावी, जी सद्यस्थितीत अश्यक. म्हणून मग सौंदर्य कक्ष / पार्लर्स उगवले / निघाले / तय्यार झाले. तेथे महिन्यातून एक किंवा दोनदा, अर्थात जशी गरज लागेल तशी मग सेवा करून घेतली जाते, भरमसाठ पैसे मोजून. असो, वरचा मजला शांत ठेवण्यासाठी, सौंदर्य खुलण्यासाठी, किंवा बहाल केलेला बहर टिकवून ठेवण्यासाठी, काही क्षण शांत निवांत घालवण्यासाठी, आणि इतर अनेक कारणांसाठी हि सगळी धडपड. पण तेव्हा आणि आत्ता देखील आहे ते भन्नाट आणि मस्त ह्यात काहीच वाद नाहीच. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...