शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

नख रंगकाम


आताशा अगदी प्रत्येक जण बहुतांशी आवडीने वैविध्य पद्धतीने नखं रंगकाम करतांना दिसतात, नजरेस पडतात. दिवसाला, कपड्याला, प्रसंगाला आणि अर्थात व्हायला साजेसं असं सगळं करतात अगदी शौक असल्यासारखे किंवा अत्यानंद झाल्यासारखे. सगळेच जण पार्लर मध्ये जाऊनच करतात असे नाही, बहुतांशी घरी पण हे सगळं पट्टाकिनी करण्यात आनंद मानतात. एक सांगा, नेल पेंट नखावर लावल्या लावल्या किंवा काही क्षणात कसा काय वळतो हो? तो फक्त शरीराच्या उष्णतेने वाळतो, का बाहेरील तापमानामुळे, का पंख्याच्या हवेमुळे? नक्की काय कारणं आहेत? का सगळे मिळून तो एक संघ असा परिणाम साधला जातो? मला विचाराल तर सर्वांमिळूनच परिणाम साधतो आणि खूप लवकर त्या नखांना शोभा येते, वेगळाच आत्मविश्वास वाढतो आणि आपलीच बोटे आपल्यालाच पुन्हा नव्याने सुंदर दिसू लागतात. माझ्या काही मैत्रिणींच्या मते तर आपलाच हात किंचित गोरा दिसतो आणि संभाळल्याचा मस्त भास होतो. जसे काही तो बोलतोय, संवाद साधतोय असा. 


अगदी तस्सेच काहीसे, आपण सर्व जी आव्हाने पेलत असतो, लहान-सहान, मोठी, त्या करता फक्त अंतर्गत शक्ती, स्फूर्ती, गर्मी कमी येत नाही तर तिच्या जोडीला वातावरण निर्मिती किंवा सहाय्यक वातावरण, आणि बाहेरील जोड महत्वाची आहे. अर्थात कोणीच फक्त बाहेरील किंवा जे आपल्या हातात नाही त्या करता थांबत नाहीच, किंवा बाहेरूनच कोणी प्रेरित केलं तरच गाडी पुढे जात नाही, तर आपण सातत्याने पुढे मार्ग क्रमण करत असतो. आपल्या सोबतच्या सर्वांना सातत्याने प्रेरित करत राहा आवर्जून किंवा आपल्या कृतीतून म्हणजे एकसंघ फारच सुंदर परिणाम साधता येतील. रंगछटा स्वतःला आणि बघणाऱ्याला देखील एक उत्कृष्ट उत्साह दिवून जाईल. आपला उत्साह टिकून राहील आणि बरेच काही. तर चला मग, लागा कामाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...