शनिवार, ३० डिसेंबर, २०२३

उपवास


माझा एक बघण्याचा दृष्टिकोन फक्त. आधीच्या काळी स्त्रिया घर सांभाळायच्या आणि पुरुष शेती किंवा अर्थार्जनाचे काम शिस्तीत करत होते. त्यावेळी सोवळं-ओवळं फार कडक होतं त्यामुळे स्वयंपाक घरात सर्वांना प्रवेश नसायचा, किंवा तशी गरज भासायची नाही. त्यावेळी गोष्टच वेगळी होती. आहार भरपूर आणि सर्वतोपरी पौष्टिक असा. कष्ट आणि महेनतीची कामे खूप त्यामुळे भूक पण लागायची आणि अन्न पचयाचं देखील. त्यावेळी बहुतांशी दिवसातून फक्त दोनदा जेवण होतं असे. न्याहारी क्वचित किंवा प्रत्येकाकडची प्रथा नव्हती. पुरुषांना स्वयंपाक घरात प्रवेश ठराविक वेळी आणि स्त्रियांना घराबाहेर जाणं मोजकेच असं काहीस होतं दृश्य, सर्वमान्य असं. घरं मोठी, वाडे आणि रूढी परंपरा देखील अगदी वेगळ्या. कुठलीही तुलना नाही, पण आजच्या मानाने फारच निराळे असे सगळेचं.  उपवासाची पण एक खास बात होती. उपवास म्हणजे फक्त दूध, फलाहार किंवा पाणी, इतकंच मर्यादित. कटाक्षाने पाळायचे उपवास करणारे. फारच व्यवस्थित निश्चय आणि संयम पाळला जायचा. उपवासाचा दिवशीचे जेवण देखील फार वेगळ्या धाटणीतले असायचे. उपवासाच्या दिवशी जेवतांना ताटावरून नाही उठायचं हा नियम नाही, कधीच नव्हता, पण त्यावेळी मुलींनी वाढायचे ठरलेले होते. पंक्तीची एक वेगळी शिस्त होती. घरं नेहेमी भरलेले असायचे. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे बऱ्याच लोकांचा राबता असायचा. भरपूर लोक एकावेळी बहुतांशी जमिनीवर / खाली बसून जेवायचे. कधी कधी जागा जशी उपलब्ध असेल तश्या प्रमाणे एका नंतर एक पंक्ती पण होतं असतं. जेवतांना बोलायचे टाळले जायचे, तो त्यावेळी अन्नाचा अपमान समजला जायचा.  तेव्हाचे ते नियम त्या वेळेनुसार संपुष्टात आलेत. ज्यांच्या घरी दोघे नोकरीला जातात, घराबाहेर पडतात त्यांच्याकडे अतिनियम पाळणे अशक्यच आहे. त्यामुळे "दोन हस्तक आणि एक मस्तक" एवढंच काय ते मनापासून अर्पण करा. "त्याच्या" साठी काही क्षण द्या नक्की तेवढं बास आहे. जेवतांना उठावं लागलं तर काहीही बिघडत नाही, उपवासाच्या दिवशी देखील. कुठलाही असा नियम कुठल्याही ग्रंथात लिहिला किंवा नमूद केलेला नाही. एक ठराव, सून, मुलगी किंवा घराची स्त्री नोकरी करणारी हवी तर मग सगळं माफ, सर्वांनी आहे तसं सामावून, समजून घेतलंच पाहिजे आणि घेतांना दिसतात बरेच जण आताशा. हा चांगला बदल आहे. नाही तर मग घरच्या स्त्रीला घरीच राहू द्या, सन्मानाने.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...