आमच्या ह्यांची गेले २४ वर्षांची सवय, अगदी ना चुकता ते काहीही झाले तरी पाळणाराच. कधीच म्हणजे कधीच त्यात खंड नाहीच. इतकी भन्नाट सवय आहे तरी पण मी बायको म्हणून मला प्रचंड राग यायचा. इतका कि विचारू नकाच. पण काहीही झालं तरी ती सवय कधीच बदलली नाही. कुठलाही डब्बा मग तो मिठाईचा असो, नाही तर प्लास्टिकचा, खाण्याच्या वस्तूंसोबत आलेला कुठलाही असो त्यातला शेवटचा घास / तुकडा हेच संपवणार आणि तो डब्बा तस्साच व्यवस्थित पुन्हा झाकून ठेवणार आहे तस्सा. काय हि सवय.
पण आताशा माझ्या लक्षात यायला लागलाय कि हे सगळं फक्त माझ्या सोयीसाठी करायचे, करतात अजूनही. म्हणजे मला माझ्या मावशींना काही कधी उरलेलं किंवा केलेलं बांधून द्यायचं झाल्यास सोप्प जातं. घरचे डब्बे द्यायला नको आणि मग ते नंतर त्यांनी परत करायला नको. कित्ती म्हणजे कित्ती माझी काळजी ती. आवडलं मला. नाण्याची दुसरी बाजू ती, बघितल्यावर / विचार केल्यावर लक्षात येतं. शतशः धन्यवाद ह्यांना.
माझ्या लेकाला काही पाठवायचे असल्यास, प्रवासात पट्टाकिनी काही बांधून द्यावे लागले तर घरचे, स्वच्छ असे, म्हणजे खाल्लं कि फेकून देता येतं, ओझं कमी आणि बाहेरच खायला नको. क्या बात है. मान गये उस्ताद. असाच माझा नेहेमी विचार करत राहा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा