शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

प्रकाश झोत


ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आणि शांतपणे जर गाडी पुढे नेण्याचे संकेत द्यायचे असल्यास प्रकाशझोताचा म्हणजे डिप्पर चा वापर करतात. पण ते रात्रीच्या वेळी, अंधारातच गाडीचे दिवे प्रकर्षाने दिसणार आणि वापरता येणार ना? अर्थात काहीच वाहनचालक ह्या पद्धतीने वाहनांच्या दिव्यांचा असा वापर करतात. दिवस उजेडी मी तरी असा वापर केलेला कधीच बघितला नाही कारण त्याचा काहीच फायदा होणार नाही. डिप्पर सारखा वापरायचा म्हणजे एक कामाचं नाही का? वाढीव काम आणि त्यामुळे पुढचा सरकला तर ठीक नाही तर ते कष्ट आणि काम वायाच, उगाच मनस्ताप तो वेगळा. असो. 


इतक्यात मी एका संस्थेमध्ये सेशन घायला गेले होते. ते ठिकाणं बरेच दूर होते. गाडी चालक दिवस उजेडी सातत्याने डिप्पर वापरतं होता. इतका कि त्याशिवाय गाडी तो चालवूच शकत नव्हता. इतका जास्त उपयोग त्या दिव्यांचा बरा नाही. पण मी कोण म्हणणार. मी आपली गप्पा बसून सगळे ह्याची देही ह्याची डोळा बघत होते. त्या बिचाऱ्या गाडीच्या दिव्यांची कीव येतं होती मला, पण काहीच तरणोपाय नव्हता. आधी झाली माझी मनातल्या मनात चिडचिड पण नंतर मी ते सगळं आनंदाने स्वीकारलं, नवीन रस्त्यावर, बाहेरच्या पाट्यांवर, विविध दुकानांवर माझं लक्ष्य वेधलं आणि ते ठिकाणं गाठलं. काय हि सवय. अर्थात मी गेली इतकी वर्षे विविध गाड्या चालवल्या आहेत त्यामुळे जास्त त्रास होतो. पण दुर्लक्ष्य करणे एवढंच माझ्या हातात होतं ते मी केलं. "असे चालक येति आणि स्मृती ठेवुनी जाती". मी अनेकदा त्या वरिष्ठ, वयाने श्रेष्ठ, अनुभवी चालकाला सांगण्याचा अथक प्रयत्न केला खरा पण मी कसा श्रेष्ठ, कित्ती वर्ष कित्ती भन्नाट गाडी चालवतो ई. ची टेप सतत सुरु होती. म्हटलं "हे पालथ्या घड्यावर पाणी आहे", सोडा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...