एका सिमेंट च्या जाहिरातीत म्हटलं आहे कि "भारत हा एक अंडर कॉन्स्ट्रुक्शन देश आहे". मला तरी फारच खरं वाटतं हे वाक्य कारण जेथे पाहावे तेथे बांधकाम सुरूच आहे. इमारती बांधल्या जात आहेत, रस्ते खोदले आहेत, आणि असे बरेच आहेत. आम्ही राहतो त्या परिसरात देखील वेगळं चित्र दिसत नाही, खूप ठिकाणी बांधकाम करत आहेत. एक तर फारच उंच इमारत बांधणं सुरु आहे, गगनचुंबी अशी. बहुतेक त्यांना ती फारच पट्टाकिनी बांधून संपवायची आहे, खूपच घाई झालेली स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे छत किंवा कॉलम बांधतांना जे लोखंडाच्या फळ्या वापरल्या जातात त्या इतक्या भराभर, वेगाने आणि एका मागून एक कुत्रं पाठिमागे लागल्यासारख्या फेकतात उंचावरून कि ज्यामुळे दचकायला होतं, भिती वाटते. ह्या थंडीच्या दिवसात पहाटे उजाडलं नसतांना आणि रात्री खूप उशीरा पर्यंत ठाकठूक अत्यंत जोरात सुरु असते. निरव शांतता असते ह्या दोन्ही वेळी त्यामुळे तो आवाज प्रकर्षाने जाणवतो. त्या काम करणाऱ्यांची कीव येते मला. अर्थात भली मोठी चमू असेल, एकच व्यक्ती इतके तास काम करत नसेल पण जे होतं आहे ते भयानक आहे. कारण सांगते. वर नमूद केल्याशिवाय सूर्याचा नैसर्गिक उजेड आणि दिव्याच्या अंधारातला उजेड ह्यात जमीन आस्मानचा फरक आहेच. अंधारात कायचं घोळ घालतात कुणास ठाऊक. सरते शेवटी हाडामांसाची माणसं आहेत, थकत असतील चं, चुका होत असतील, १९-२० इकडचे तिकडे नक्कीच होणार, १००% खात्री आहे. "चालतंय कि" / "चलता है" हि वृत्ती किंवा स्वभावाचं झाला आहे. पट्टाकिनी बांधकाम करून सुपूर्त करायचं, बास. किती वेळा असे निक्षून ऑडिट होत असणार ह्या सगळ्याचं? खूपच कमी. आणि त्यात एकदा का नाव झालं त्या व्यावसायिकच कि पुरे. इतक्या खोलात जाऊन कुठला ऑडिटर चाचपणार? कोणीही नाही. आणि मग ह्या अश्या बांधकामाला करोडो रुपये मोजायचे? कशासाठी? अर्थात पर्याय नाही आहेत काही वेगळे जास्त त्यामुळे चालतंय सगळ्यांचं. "सेकंड हॅन्ड स्मोक" हि एक घातक संकल्पना आहे. अगदी तशीच आता मला हि देखील महाघातक वाटते "सेकंड हॅन्ड साऊंड". विविधतेने नटलेले भयानक आणि अचानक येणारे आवाज. माझ्या सारख्या दूर ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीला ते इतकं प्रकर्षाने जाणवतं मग त्या बांधकाम करणाऱ्यांना काय वाटत असेल? सवय झाली आहे त्यांना हे ठीक आहे पण तरी नकोच वाटणार. असो, त्यांना देखील पर्याय नाही ना. आजूबाजूला राहणाऱ्या जेष्ठ नागरिक, लहान बाळं ह्यांना, किंवा रुग्णांना पण फार त्रास होत असणार पण सांगतो कुणाला? नियम नाहीत, धरबंध नाहीतच, सामाजिक जबाबदारी वगैरे संकल्पना तर ठाऊकच नाहीत. नियम तर सगळे कधीचेच माळ्यावर फेकले आहेत. घोर कलियुग.
गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा