हि जी आजची तरुण मंडळी आहेत ती त्यांचा मोबाईल सतत सोबत ठेवतात, का कुणास ठाऊक? इतका सतत कि ते जेथे जातील तेथे त्यांचा तो अवयव बरोबर आहेच, असतोच. मला नेहेमी प्रश्न पडायचा कि हे असं का? इतकं काय महत्वाचं आहे त्या मोबाईल मध्ये? आणि इतका तो प्रत्येक वेळी बाळगलाच पाहिजे का? आणि खरं सांगू मला अश्या तमाम सर्वांचा खरं तर प्रचंड राग येत होता आधी पण काल ह्या मागचा दृष्टिकोन बदलला, ह्या कडे मी आता एक सुरक्षेच्या मार्गाने बघते आहे.
पासपोर्ट किंवा तत्सम महत्वाची कागदपत्रे ठेवण्याकरता एक पिशवी असते कि कमरे भोवती बांधली जाते. किंवा कंडक्टर वापरतो तशी पण पिशवी चालेल जी गळ्याभोवती घालून ठेवली जाते. अशी पिशवी अगदी प्रत्येकाने ठेवावी आपल्या सोबत, त्या मोबाईल ला बाळगण्यासाठी, हात मोकळे राहतात आणि शिवाय तो सोबत सुरक्षित राहतो ते वेगळंच, पडत नाही, डाग लागत नाही, कुठे ठेवायचा हा प्रश्न नाहीच आणि शिवाय वाजला किंवा गुरगुरला कि समजतं लागलीच. म्हणून हि सूचना. आणि खास करून जे जेष्ठ नागरिक आहेत, जे घरी दारी एकटे आहेत त्यांनी तर आवर्जून हि पिशवी वापरावीच न चुकता, न आळस करता, नेहेमी करता. ह्या शिवाय एक पर्याय आहे तो म्हणजे ठिकठिकाणी लावलेले फोन, बाथरूम मधे आणि इतर जेथे गरज आहे तेथे. एखादी बेल तरी लावावी म्हणजे जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवलीच तर कमी येईल तंत्रज्ञान. आता आहे टेकनॉलॉजी तर पुरेपूर वापर करून घ्यावा. आणि हे काही जास्त खर्चिक पण नाही ना. जर आपल्या जवळ मोबाईल असला तर गरजे वेळी तो वापरून कोणाला तरी सुचीत करता येईल वेळेत. काल आमच्या सोसायटीत भलेमोठे लाल रंगाचे इंजिन बघितले तेव्हा लक्षात आलंच कि काही तरी गडबड आहे आणि मग समजले कि एक आबा एकटे घरात अडकले होते. ह्या प्रसंगावरून हे सगळं ध्यानात आलं आणि समजलं / उमगलं कि नवीन पिढी आपल्या पेक्षा चार पावलं पुढे कशी आहे ते. सातत्याने तो मोबाईल नामक अवयव सोबत बाळगण्याचे फायदे काल जास्त प्रकर्षाने जाणवले. अर्थात हा फक्त एक भाग झाला त्या मोबाईल वापरण्याचा.
ह्या वरून मला हे देखील पट्टाकिनी आठवले कि अमेरिकेतले पोलीस लोक जेव्हा आमचे धडे घ्यायला आले तेव्हा त्यांनी देखील सांगितले होते कि मोबाईल हा फक्त आपत्कालीन स्थितीत वापरण्याचे साधन आहे. त्याला उगाच वापरात बसू नका, वेळ फुकट घालवू नका कारण तो अत्यंत महत्वाचा आहे. मर्यादित वेळ आणि महत्व द्या त्या वस्तूला, कारण ती फक्त एक वस्तू आहे. त्या शिवाय अनेक पिढ्या जगल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा