हि एक फारच उपयुक्त म्हण आहे आणि मला फार म्हणजे फार आवडते. त्यात एक भर पडली, मी मागे लिहिल्याप्रमाणे प्रसिद्ध शेफ म्हणतात ना कि प्रत्येक व्यक्ती अनेक प्रकारे खातो, बघून, सुगंध घेऊन, मांडणी नुसार आणि मग चाखून. त्या पद्धतीने जे स्वयंपाक घरात काम करतात ते अगदी थेंब चाखतात आमटी चा, भाजीच्या रस्याचा किंवा काही तर बघून आणि सुगंध घेऊनच ठरवतात, आनंद उपभोगतात कि हा जिन्नस, हा पदार्थ उत्कृष्ट, चविष्ट असाच झाला आहे. त्यात काहीच दुमत नाही. म्हणजे बघा ना, एक थेंब आमटी, त्याचा सुगंध आणि सौंदर्य अनेकविध रंगानी नटलेलं / सजलेलं असं, कित्ती सांगून जातं, त्या स्वयंपाक करण्याऱ्याला, घरच्यांना, आजूबाजूच्यांना अहाहा च. काय म्हण तय्यार केली आहे, जबरदस्तच. प्रत्येक वेळी कोणी सांगितले आहे कि शीत आणि भातच हवा? तो फक्त गमक जुळवण्याचा भाग झाला किंवा एक पर्याय. आपण त्याचा वापर कसा करायचा हे आपण ठरवायचे नाही का?
आणि हो हे फक्त पदार्थांनाच लागू नाही बरं का, बाकी इतर खूप ठिकाणी पण चपराक बसण्यासारखे वाक्य आहे. असं म्हणतात ना कि मुलगी हि आईची सावली असते. तुम्ही कुठल्या शिक्षकांकडे शिकलात? कुठे राहता? कुठे नोकरी करता? कुठली गाडी चालवता?
आणि हो फक्त येणाऱ्या पुढील पिढी, किंवा पदार्थ किंवा अजून तत्सम असे नाही तर मागचा पण सगळा इतिहास भूगोल स्पष्ट होतो ह्या म्हणीचा वापर केल्याने. माझे बाबा नेहेमी म्हणायचे कि "युअर वर्क शुड स्पिक अबाउट यु नॉट यू". एक पिटुकला तो जीव, ते शीत शेतकरी कोण? कसा पाऊस पडतो? कशी मशागत केली आहे? कुठल्या प्रकारची पेरणी? आणि इतर सगळे आधीचे आणि त्यावरून मग चवीचे बोलतो, सांगतो, क्या बात है? जो हा म्हणीचा जन्मदाता आहे त्याला कोटी कोटी प्रणाम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा