आपल्या देशात इतके विविध पदार्थ का आहेत? त्या विविध पदार्थांमधे इतके वेगवेगळे मसाले किंवा जिन्नस का घातले जातात? आपली भाषा इतक्या हजारो शब्दांनी परिपूर्ण का आहे? आधीच्या काळी आणि आता सुद्धा काही ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती का होती / आहे? बहुतांशी मुलं (सगळी नाहीत, अपवाद आहेत) सदा काही ना काही कुरबुरी का करत असतात? "ससुराल गेंदा फुल... " असे गाणे का लिहिले गेले? असे अनेक प्रश्न माझ्या देखत उभे ठाकले आणि त्याचे उत्तर देखील ताबडतोब मिळाले. ते असे, कि जे सातत्य टिकवून ठेवतात ते आज ह्या जिन्नसाला तर उद्या त्याला नावं ठेवतात, असं महिनाभर / काही वेळ सुरु राहतं आणि मग ये रे माझ्या मागल्या सारखं पुन्हा ते मूळ पदावर / जिन्नसावर येऊन विराजमान होतात. आधी काही शब्द उच्चारले जातात, मग विविधता आणि त्यांची माहिती किंवा दरारा (त्यांच्या दृष्टीने) टिकून राहावा म्हणून विविध पातळीवर जाऊन "उचलली जीभ.." असं करायचं. म्हणून तर शिकलेत शाळेत आणि महाविद्यालयात जाऊन हे सगळे, उच्च विद्याविभूषित. एक जण असा कमी होता म्हणून मग बाकी बारी बारी सुरु होतात. काय मज्जा आहे ना विविधतेत एकता. कुठल्याही स्तरावरची मुलं असोत, शिकलेले, न शिकलेले, उच्च पदस्थ, अगदी साधे मजुरी करणारे, गोरे काळे, उंच ठेंगणे, सगळे. आत्ता लक्षात आलं, इतके पदार्थ, जिन्नस, शब्द मग कसे वापरले जातील ना? वाया जाईल सगळे कष्ट आधीच्या लोकांनी केलेले, जिन्नस शोधण्यास, पाककृती तय्यार करण्यात, शब्द संग्रह मोठा करण्यात ई. म्हणून हे उपटसूंभ सुरूच ठेवतात आणि त्यांचं अस्तित्व अजिबात कमी होऊच देत नाहीत. पुढील व्यक्तीने आता ठरवायचं कसं, काय आणि कितपत वागायचं ते, सगळं सांभाळून.
मला फक्त आज पर्यंत एकाच बाजू ठाऊक होती ती म्हणजे प्रत्येक दहा मैलावर भाषा, संस्कृती,खाद्य पदार्थ, बोली असं सगळं बदलतं. अनेक कचेरीतुन कर्मचारी वैविध्य देशात कामाला पाठवले जातात कारण त्यांनी तेथील सभ्यता, आणि चांगल्या गोष्टी, आदर्श, आदर कसा बहाल केला जातो हे सगळं शिकून यावं, आत्मसात करावं, आणि ते त्यांच्या कृतीतून दृश्य दिसावं, इतकं कि बाकी लोकांमधे पण आवश्यक बदल घडेल. अनेक पद्धतीने पदार्थ होऊ शकतो, प्यासिव्ह ऍक्टिव्ह व्हॉइस, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग शाळेत शिकवले आहे ते वापरण्याकरता हे विसरून चालणार नाही. सगळं आधी द्या तर घ्या, मिळावा असं काहीस असतं. विविध शब्द, चवी, संस्कृती, पद्धतीने हळूहळू व्यक्तिमत्व घडतं, घडायला हवं. पण अनेक ठिकाणी हे पाहायला मिळत नाही. हे दृश्य, चित्र नक्कीच बदलायला हवं. म्हणजे सगळेच गुण्या गोविंदाने नांदतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा