अवंती नावाचा अर्थ अंतहीन, विनम्र असा आहे. अवंती हे नाव खूप सुंदर आहे आणि लोकांना हे नाव आवडते. मराठी प्रचलीत असे हे नाव आहे कारण या नावाचे स्वतःचे महत्त्व आहे. अवंती चा अर्थ अंतहीन, विनम्र असा आहे आणि अशी सुविद्य लेक, तिची वैशिष्ट्ये, स्वभाव आणि वर्तन त्याच्या अर्थानुसार असणारच. अजून काही ठळक वैशिष्ट्ये आहेत अवंती ची, स्थिर, शांत, घर प्रेमळ, तपशील देणारी, आज्ञाधारक, विश्वासार्ह, तार्किक, सक्रिय, संघटित, जबाबदार आणि विश्वासार्ह. (babynameseasy.com)
अवंती हे नाव सामान्यतः आश्चर्यकारक व्यवस्थापन कौशल्यांसह आशीर्वादित आहे. ती विखुरलेल्या दस्तऐवजांचा सारांश, क्लिष्ट परिस्थिती सांभाळून घेण्यात आणि संयमाने समस्या हाताळण्यात खूप चांगली आहे. आणि तिच्या कडे सुपर रिजनिंग पॉवर असल्यामुळे / तर्कशक्ती, तर्क-वितर्क मांडणे, तर्क समाविष्ट करून घेणे ई. सहज साध्य होते, जे संशोधन करण्यासाठी, म्हणजे विद्यावाचस्पती ह्या उंची वरचे, स्थराचे, फार महत्वाचे आहे. आणि ते अवंतीने करून दाखवलेच. माझी आणि ह्या अवंतीची, डॉक्टर. अवंतीची ओळख साधारणतः २०१३-१४ च्या दरम्यान झाली. आम्ही एकत्र एका खास प्रकल्पावर काम करत होतो तेव्हा. आम्ही दिड वर्ष एकत्र काम केले, बहुतांशी दररोजच, कारण कामाची उंची तशीच होती, खूप काही करून दाखवायचं होतं. अनेक दस्तावेज ठराविक पद्धतीने तय्यार करायचे होते, उभे करायचे होते. आणि आम्ही बहुतेक सगळ्या जणी पहिल्यांदाच ह्यावर काम करत होतो. ती एक वेगळी ऊर्जा होती आणि ती टिकवून ठेवायचे काम अवंती ने बखुबी निभावले, अर्थात ती ज्या एका बहुगुणी मॅडम सोबत काम करत होती त्या देखील होत्याच दिशादर्शक म्हणून. पण अवंतीने खूप मस्त सगळं घडवून आणलं. ती आधी आंतरराष्ट्रीय महाविद्यालयात शिक्षकेतर पद्धतीने आपले योगदान देत होती, मग ऐके दिवशी तिने शैक्षणिक क्षेत्रात येण्याचे ठरवले, ती भल्यामोठ्या संस्थेत रुजू झाली आणि तदनंतर PhD ला सुरवात केली. केवढा मोठा आणि वेगळा बदल होता तो. पण तिच्या मूळ स्वभावामुळे ते सहज शक्य झालं. एवढ्यातच आमची अवंती डॉ. अवंती झाली. करावं तेवढं कौतुक कमीच आहे अवंतीचं. मी स्वतःला लेखिका समजते, अर्थात लघुकथा किंवा अनुकथा टिपणारी एक मुलगी, पण मला सुद्धा योग्य शब्द सापडत नाही आहेत, जुळवाजुळव जुजबी करण्याचा हा छोटेखानी प्रयत्न आहे माझा. तिच्या भव्य याच्यापुढे हे चार शब्द फिके, पण खरंच लिहावसं वाटलं. म्हणून हा पंक्ती प्रपंच. खूप म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे डॉ. अवंती कडून निश्चितच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा