दोन जानेवारी
पासून मी कचेरीत बस ने जायला लागले. त्यामुळे मला सकाळी नाश्ता, डब्बा ई. झाल्यावर
थोडी उसंत मिळाली आणि मग काय माझी आणि लेकीची बडबड सुरु झाली ताबडतोब. विषय होता
फेअरवेल / अक्का निरोपसमारंभ. ती सध्या बारावीत आहे आणि ह्या वर्षी सगळ्या
पालकांना आणि विद्यार्थ्यांना बोलावून निरोप समारंभ शाळेत किंवा बाहेर होणे अवघड
आहे. ह्याच तिला फारच वाईट वाटत आहे.
दहावीत फारच
एन्जॉय केला ह्या मुलांनी त्यामुळे ह्या वर्षी झाला असता कार्यक्रम तर मज्जा आली
असती आणि खूप साऱ्या नवीन आठवणी निर्माण झाल्या असत्या. पुढल्या वर्षी पासून सगळे
आप आपल्या ठिकाणी व्यस्त राहणार आणि त्यामुळे सगळा वर्ग एकत्र येणं महा-अवघड.
त्यावर मी दोन मुद्दे मांडले, १. आपण सगळं नीट झाल्यावर पुढाकार घेऊन करू छोटीखानी
समारंभ, २. माझ्या शालेय जीवनात आम्ही सगळेच मित्र मैत्रिणी इतक्या बिनधास्त होतो,
सगळ्या गावभर हुंदडायचो, सगळयांच्या घरी यथेच्छ खायचो, ना आम्हाला ना आमच्या
पालकांना आक्षेप होता. मग अश्या वातावरणात वाढलेले आम्ही, किती मिस केलाय आमच्या
मित्र मैत्रिणींना आमचं आम्हालाच माहित.
पण आता
तंत्रज्ञानामुळे पुन्हा सगळे आलेत एकत्र आणि पुढल्या वर्षी बहुतेक सगळेच थोडेसे
मोकळे पण होतील मग आम्ही देखील काही तरी झक्कास प्लॅन करू. आणि त्यानंतर पुढे करत
राहू. नेहेमीप्रमाणे तिच्याशी बोलताना, तीच ऐकतांना मज्जा आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा