आधीच्या काळी
थिएटर ला जाण म्हणजे फारच खालच्या दर्जाचं समजलं जायचं, अर्थात त्याची कारणं हि
तशीच होती आणि तो काळ हि वेगळाच होता. त्यानंतर थिएटर ह्या शब्दाला एक कलेच्या आणि
वेगळ्या चांगल्या दृष्टीने बघितलं गेलं, अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्व बहरले गेले आणि
फार पुढे आले ह्या थिएटर मुळे. अतिशयच सुंदर कलाकृती निर्माण झाल्या आणि प्रत्यक्ष
जाणकार प्रेक्षकांपुढे सादर करणं नाटक, संगीत नाटक, एक पात्री ई. हे आव्हानात्मक
आहे / होत.
त्यानंतर
सिनेमा हा प्रकार प्रकाशात आला आणि मोठा पडदा हि उदयास आला. अनेक नवीन कलाकार पुढे
आले, तंत्रज्ञान बहरत गेलं, दृकशाव्य माध्यम, रंगीत संगीत पूर्ण माध्यम प्रचलित
झालं आणि मग काळ जसा सरकत गेला तसा ह्या थिएटर चा कायापालट झाला, एक स्क्रीन ते
अनेक स्क्रीन अशी क्रांती झाली. आणि मग थिएटर मध्ये जाण हा एक फार नित्याचा भाग
झाला, सगळ्या कुटुंबासहित. तर अशी हि साठा उत्तराची कहाणी... आज सगळेच
आतुरतेने थिएटर आणि सगळंच जनजीवन पूर्ववत होण्याची वाट पाहत आहेत, म्हणजे पुन्हा
मोठा पडदा, मोठा आवाज, अतिमोठा वातानुकूलित हॉल, आणि विचारापलीकडले महाग खाण्याचे
पदार्थ उपभोगता येईल.
https://youtu.be/hQ7jeqiilxo
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा