अगदी पूर्वी मला जे वाचनात आलं आणि जे ऐकलं त्या प्रमाणे लग्न हे मुलीच्या दारातच लावलं जायचं, बहुतांशी, कारणं अनेक आहेत,
vकदाचित जागा मोठी असेल, सगळे वऱ्हाडी मावतील अशी,
vसोय,
vपद्धत त्या वेळची आणि
vअर्थात पैशाचं गणित देखील.
त्यानंतर विविध
हॉल उपलब्ध झाले, भाड्याने घेतले जात आणि तेथे लग्न लागत असे. बऱ्याचदा अनेक
कुटुंबांमध्ये ठराविक गावी किंवा गावाच्या देवळातच लग्न लावण्याची पिढ्यांपिढ्या
रीत आहे. मग काळ बदलला आणि प्रसिद्ध ठिकाणी, शहराबाहेर लांब, देशाबाहेर ई. स्थळ /
ठिकाण लग्नासाठी जास्त भावली. त्यात भर म्हणजे हॉटेल मध्ये
सुद्धा लग्न लागत होतीच कारण पुन्हा तीच, सोय, एका छताखाली सगळं उपलब्ध वगैरे.
पण मला ह्या
सगळ्या विविध ठिकाणांवर लग्न लागतात आणि त्या नंतर टिकतात ह्याचा काही संबंध आहे का? हा विचार आज मनात आला,म्हटलं
लिहावं. पत्रिका बघून, मुहूर्त बघून, ठिकाण विचारपूर्वक ठरवून, थोरामोठ्यांचे
आशीर्वाद घेऊन, मंत्रोपचारांत आणि सगळ्या संस्कारानी युक्त असं साग्र संगीत मिश्रण
आणि वास्तव्य ह्यात मग का तफावत आठळते? मग ह्याच चपराख उत्तर / रामबाण इलाज काय?
माझ्या मते प्रत्येकाने आनंदाने सगळ्यांना समजावून सामावून घेत प्रत्येक
दिवस घालवावा म्हणजे मग लग्न कुठे झालं होत आणि मुहूर्त काय होता ई. कदाचित फरक
पडणार नाही. तुम्हाला काय वाटत मंडळी?
https://youtu.be/HR7fgjZGeeE
Contact mail id for your views and comments if any: drpreetimulay@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा