मागच्या दिवाळी
च्या दिवसातली गोष्ट असेल हि, आमच्या एका ओळखीच्या कुटुंबात अतिशय उत्साहाचं
वातावरण होत कारण त्यांच्या मुलाचं लग्न ठरलं होत. डिसेंबर ची तारीख हि पक्की
झाली. आणि नवीन होणार जोडपं संपूर्ण एक दिवस ठरवून गावाबाहेरच्या ठिकाणी गेले
"प्री वेडिंग शूट" करायला. प्रचंड धमाल आणि अप्रतिम फोटोस. त्यानंतर
लग्नाचे फार आगळे वेगळे फोटोस काढले / काढून घेतले, मग काय विचारात नवरात्रीच्या
आधी काही दिवस अजून एक भरभरून फोटोस चा अल्बम तय्यार झाला, कारण "प्री बेबी
शूट" केलं त्यांनी, पुन्हा एकदा खरंच जगा वेगळं आणि आता छोटा सांता, काय दिसतोय फोटोत, अहाहा.
ह्यावेळी तिघं मिळून बेबी शूट म्हणावं लागेल. जबरदस्त. कमाल आहे उत्साहाची. सगळेच
आकाशाएवढे प्रचंड उत्साही. त्या फोटोग्राफर ला गाठून, जागा निवडून, अनेकविध पोशाख
आणि त्याला शोभतील असे दागदागिने आणि बरेच काही. अप्रतिम.
फक्त फोटो
काढतात म्हणून नाही पण माझ्या मते ह्यालाच भरभरून जगणं म्हणतात, उत्साह निर्माण
करणं, नवीन गोष्टी आत्मसात करणं, सातत्य टिकवणं आणि हे सगळं परम आनंदाने करणं ....
जबरदस्तच.
YouTube Audio Link: https://youtu.be/m2A7eiJX9SM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा