२१ आणि चतुर्थी
…….. 
आज नवीन वर्षातला कचेरीतील माझा पहिला दिवस. काय योगायोग आहे बघा, मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे २१ हा आकडा गणपती बाप्पाना फारच प्रिय, आज दोन जानेवारी, त्यांची चतुर्थी आणि
वर्षाचा पहिला दिवस कचेरीत, अजून काय हवं. अश्या शुभ दिनी कामाची सुरवात नवा जोम
देऊन जाणार ह्यात काही शंकाच नाही. सर्व जण मंगल दिवसाला सुरवात करत आहेत म्हणजे
फारच अप्रतिम. अर्थात सगळेच दिवस सारखे आणि शुभ पण.
पण आज कणभर जास्त मंगलमय वाटतंय. सगळेच गुरु, आधुनिक गुरु आणि संत सांगतातच न कि आपण मुहूर्त बघून जन्माला येत नाही, तो दिवस ती वेळ आपल्या हातात नसतेच, मग काय तो जीव शुभ नाही, उपयोगी नाही, असं काहीही नसतंच खरंतर. ह्या आज कालच्या नवीन दिवसात लग्न पण माणसांच्या सोईनुसार होत आहेत, प्रत्येक वेळी मुहूर्त बघितला जाईल आणि तो सोयीचा असेलच असे नाही.
YouTube Audio Link: https://youtu.be/i_8uo6ccWkw
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा