मी जेव्हा ऑफिशिअल रिव्हूवर झाले काही जर्नल ब्लिशर ची त्या आधी त्यांचे काही ट्रैनिंग्ज करावे लागतात आणि त्यात बरेच काही शिकायला मिळते. त्यात कशाला महत्व द्यायचं हे पण शिकवलं / सांगितलं. अर्थात संशोधन कामाची माहिती लिहिलेल्या लेखाचं नाव पण तस्संच भन्नाट असावं हि माफक अपेक्षा असतेच. तसेच काहीसे मला ध्यानात आले गेली अनेक वर्ष, विविध लेख वर्तमानपत्रात, सोशल मिडिया ई. वर वाचतांना. किंबहुना वर्तमानपत्राचे नाव हे पण तितकंच महत्वाचं माझ्या दृष्टीने. शीर्षक फार मोठं काम करून जात, मन जिंकण्याचं, वाचकांचं. आज पुन्हा एकदा त्याचा मला प्रत्यय आलं म्हणून हा लेख प्रपंच. त्यात वर्तमानपत्राचे नाव पण प्रसंगानुरूप बदल हा मला फार भावला. आधीच टाइम्स ऑफ इंडिया हेच मला फार भावलेलं नाव त्यात आज आपले खेळाडू ऑलम्पिक सारख्या दिग्गज खेळात सामील होण्यासाठी मार्गक्रमण करणार त्याकरता TOI ने त्यांचं शीर्षक The Dreams ऑफ इंडिया असं बदललं आज पुरत. वा वा, ज्यांच्या कोणाच्या डोक्यात हि सुपीक कल्पना आली आहे त्यांना माझा साष्टांग दंडवत. तुफान च. TOI अक्का DOI मेड माय डे. आजचा दिवस इतका स्फूर्ती ने सुरु झाला कि ज्याचं नाव ते. शतश: धन्यवाद आणि असेच नवीन ताजे अनुभव देत राहा माझ्या सारख्या सगळ्या वाचकांना.
#TOI #Times-of-India #Newspaper
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा