माझ्या ऑफिस च्या मार्गावर एक भलं मोठं स्वतंत्र घर आहे, तीन - चार मजली असं. त्यात तळमजल्यावर दोन दुकानं होती, एक ATM आणि दुसरं दुकान कपड्याचे. शेजारी एक जिना होता आणि मागे / वर गाववाले / कुटुंब राहतं होत असं दिसायचं, कपडे वाळत घातलेले दिसायचे. माणसं पण दिसत होती अनेकदा कारण घरच होत ते.
ह्या नवीन दिवसांमुळे दोनदा ऑफिस बंद होत मधल्या काळात, त्यामुळे बरेच दिवस लक्ष गेलं नाही माझं त्या घराकडे, पण आता ऑफिस सुरु झालं आणि अचानक माझं त्या बिल्डिंग कडे लक्ष गेलं. त्याच कारण म्हणजे अचानक दिसलेला हॉस्पिटलचा बोर्ड. पुन्हा एकदा नीट बघितलं तर अवाक झाले. दोन्ही दुकानं काढून टाकली आहेत, संपूर्ण लूक्स बदलेले आहेत आणि काळाची गरज लक्षात घेऊन घराचं पॉश इस्पितळात रूपांतर केलेलं दिसतंय, झटकापटकी.
अनेक रुग्णांना नक्कीच फायदा होईल ह्यात शंकाच नाही. अगदी रस्त्यावर ती बिल्डिंग असल्यामुळे जाणंयेणं, पोचणं, अँप्रोच ई. सगळं सोप्प आहे. ज्या चमूने ह्या रूपांतर करण्यासाठी शिवधनुष्य उचललं ते फारच धन्य आहेत, माझ्या दृष्टीने. इतकं सोप्प नाही ना राहत्या घराचं इस्पितळात रूपांतर करणं. बघावं ते नवलच. मग तिथे राहणारे कुठे गेलेत असतील? का त्यांनी हा निर्णय घेतला असेल? किती खर्च आला असेल? राहत घर म्हणजे निवासी जागा आणि इस्पितळ म्हणजे व्यावसायिक, मग हे सगळं कसं काय बदल केले असतील?असे अनेक विचार आणि प्रश्न माझ्या मनात आले म्हणून लिहावसं वाटलं.
#Transformation-of-building #Hospital #House #Useful-for-patients #Reasons-of-transformation #Residential #Commercial #Paradigm-shift
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा