मंगळवार, २७ जुलै, २०२१

"मी कात टाकली"

गेले अनेक वर्ष मला "जगी, स्थळी, पाषाणी" = ठिकठिकाणी मुली security guards / वॉचमेन दिसतात, ते इस्पितळ असो, विद्यालय असो नाहीतर अजून बाकी ठिकाण, जेथे जेथे वॉचमेन ची गरज आहे तेथे तेथे ह्या आहेतच हजर कामाला. आवाहनात्मक आहे मुलगी / स्त्री असून वॉचमेन चं काम करणं, सोप्प नाहीच. अर्थात प्रत्येकाला, मुलगा / मुलगी कोणालाही कुठलंच काम फार सोप्प नसतंच. पण वॉचमेन च्या क्षेत्रात पुरुषांची आधी मक्तेदारी होती, आता चित्र बदललं आहे, कारण तिने "कात टाकली आहे". 

वॉचमेन म्हटलं कि पोशाख आला आणि तसं बघितलं गेलं तर अगदी साध्या घरातल्या मुलीच / स्त्रिया दिसतात वॉचमेन ची नोकरी करतांना. त्यांच्या कडे २०२१ साली देखील साडी, बांगड्या आणि इतर गोष्टी परिधान करणं आवश्यक आहे, आणि त्यात लग्न बंधनात पण लवकर अडकतात ह्या मुली / किंबहुना खूप जणी अडकवल्या जातात. मग लग्न झालेली मुलगी शर्ट पॅन्ट घालून नोकरी वर जाण येणं म्हणजे मानसिक स्थरावर पण लढाई आलीच. 

जेव्हा जेव्हा मी ऑफिसाला येते तेव्हा तेव्हा असंख्य  मुली वॉचमेन चा पोशाख परिधान करून बसची किंवा वाहनांची वाट बघत रस्त्यावर उभ्या दिसतात आणि दर वेळी त्यांना मनःपूर्वक मनातल्या मनात धन्यवाद देते आणि त्यांच कौतुक करते. लिहावं असं वाटायचं, आणि आज त्याचा मुहूर्त लागलाच. 

माझ्या कचेरीत जे वॉचमेन आहेत त्यांचं मी नेहेमी निरीक्षण करते तेव्हा असं दिसत कि ते नेहेमीचे कपडे घालून ऑफिस ला येतात आणि इथे येऊन गणवेश घालतात / कपडे बदलतात. पण असं सहजी मुलींना जमणं थोडसं अवघड आहे. अर्थात करतात गरज असेल तेव्हा पण प्रत्येक वेळी नाही जमत. 

माझ्या साठी ह्या मुलींचा साडी ते शर्ट-पॅन्ट-बूट हा प्रवास कात टाकण्यापलीकडचा आहे. आधी फक्त साडी च्या ऐवजी आवश्यक पोशाख एवढाच बदल केलेला दिसत होता ह्या मुलींनी, पण आता नाही हो. आता बऱ्याच जणीनी पोशाखाला साजेस तय्यार होणं पसंत केलं आहे. 

ह्या सगळ्या आघाड्यांवर लढाई असते आणि ती त्या हसत मुखाने निभावतांना दिसतात देखील. सर्व वॉचवुमन / सिक्युरिटी-गर्ल्स ना माझा नमस्कार. 

#security-guards #watchmen #uniform #pant-shirt-shoes #transformation #saree-to-shirt #support-for-family #wonderful-change #challenging #hospital-guards #education-institute-guards

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...