बुधवार, २८ जुलै, २०२१

मोबाईल रामायण

आमच्या गल्लीत एक अतिशयच देखणा भूभू / आकू आहे, माझा चार पायाचा दोस्त. तो इतका प्रचंड उंच आणि सडपातळ आहे कि ज्याचं नाव ते. माझ्या गेट च्या शेजारी एक भिंत आहे, त्यावर एक शाळकरी मुळांचे टोळकं बसलं आहे ह्या क्षणी. आमच्या समोर एक छोटी वस्ती आहे तिथली हि मुलं / विद्यार्थी. त्यांच्या हातात फारच नवीन मॉडेल्स आहेत मोबाईल फोन चे. ते त्या भिंतीवर बसून त्या देखण्या आकू चे फोटो काढतांना माझं लक्ष वेधलं गेलं. आणि मग जरा जास्तच लक्ष देऊन बघितलं तर काय समजलं हे सांगते. मी हातातलं सगळं सोडून त्याचं निरीक्षण करते आहे.

१. काल परवा ह्याच मुलांना मी सकाळी विचारलं "शाळा नाही का?" उत्तर: "दुपारी एक वाजता सुरु होते मोबाईल वर".
२. हि मुलं कुत्राचे फोटो काढत आहेत
३. लेटेस्ट गाणे ऐकणं सुरु आहे, भल्या मोठ्या आवाजात
४. शेजारी शेजारी बसून विडिओ चॅट सुरु आहे
५. एक पण गाणं पूर्ण ऐकत नाही आहेत, सतत इकडून तिकडे गाणे बदलत आहेत
६. शिवाय गप्पा सुरु आहेत त्या वेगळ्याच

आणि हे सगळं जीवतोडून मोठ्या आवाजात मराठीत शिक्षक शिकवत असतांना. काय म्हणायचं? 

आई वडिलांनी नाही, फक्त आईनी अपार कष्ट करून महागडा न-परवडत असतांना फोन घेऊन दिला तो हे सगळं करण्यासाठी?

मला माझीच लाज वाटते आहे, मला नाही जमत इतकं अगणित कामे करणं / multitasking करणं, PhD कॉम्पुटर इंजिनीरिंग मधे असतांना. एकाच वेळी एकाच फोन वर शिक्षक शिकवत असतांना गाणं ऐकणं काय, गाणे बदलणे काय, फोटो काढणे, विडिओ चॅट आणि कोणास ठाऊक काय काय करत होते... मग हे सगळं करण्यासाठी जर डोकं आहे तर मग आई एवढे कष्ट करते, आपण व्यवस्थित अभ्यास करावा, उत्तीर्ण व्हावं एवढं साधं कसं कळत नाही ह्या मुलांना? मला तर हा संशोधनाचाच विषय दिसतोय, कुठून आणतात असला मोबाईल पॅक, कुठली बॅटरी, इतकी तास चालणारी, आणि ह्या सगळ्यासाठी पैसे? डोळ्यांचं काय? बाप रे बाप, मुंग्या आल्यात, डोकं जड झालाय माझं अगदी, हे सगळं बघून.  

मी काय करू म्हणजे हि तरुण मुलं मार्गी लागतील?

उगाच सगळे "देशाची प्रगती" होत नाही, ई. विषयावर बोलतो, शिक्षकाला वठणीवर धरतात जर निकाल चांगला लागला नाही तर,  हि मुलं
काय करत आहेत ते बघा म्हणावं पहिल्यांदा. आई बिचारी दिवसभर घराबाहेर कामाला जात असेल आणि ती तिच्या भलत्याच विश्वात, संपूर्ण विश्वास कि माझा मुलगा अभ्यास करतो आहे मोबाईल वर. 

अशक्य आणि अवघड आहे. मी बोलायला गेले तर काही पळून गेले आणि बाकी माझ्यावर गुरगुरले.

त्या देखण्या भूभू मुळे आणि
फोटो काढतांना  तो जसा उभा होता ते बघून हे सगळं सुरु झालं. देवा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...