माझी दहावीची परीक्षा संपली रे संपली कि मी दोन क्लास लावले होते, एक टायपिंग आणि दुसरा कांथा वर्क चा. पट्टाकिनी दोन्ही हस्तकला अवगत केल्या आणि भरतकाम / विणकाम माझे अखंड चालूच राहिले मी इंजिनिअर झाली, ३-४ वर्ष नंतर नोकरी केली तो पर्यंत. म्हणजे जवळपास १० वर्ष सलग मी विविध हस्तकलेशी जुळलेली होते. संपूर्ण घर भरलं होत विविध आर्ट फॉर्म नी. त्यानंतर जे बंद पडलं ते आज पर्यंत. असो.
ह्या माझ्या हस्तकलेच्या प्रवासात मान, पाठ, डोळे ह्यांची पार वाट लागत असे, पण जसा कि एक ध्यास लागला होता विविध कला शिकण्याचा आणि घडवण्याचा, त्यामुळे एकदा का ते हातात घेतलेलं भरतकाम / विणकाम / चित्र ई. पूर्ण झालं कि काय समाधान मिळत असे. मला शब्दात मांडणं अजिबातच शक्य नाही. खूपच संयम लागतो, कच्चा माल लागतो, आणि प्रचंड मेहेनतीच वेळखाऊ काम आहे ते. अर्थात मी फक्त नवीन काही तरी शिकण्यासाठी, फक्त माझ्या घरासाठी हे सगळं करत होते ते ठीक आहे, पण अशी कलाकृती नंतर कोणाला देऊन टाकणे जरा अवघडच. मी अनेक प्रयत्न केले आणि भरपूर थर्मोकोल च्या गोष्टी करून भेट म्हणून दिल्या देखील पण आपल्या मेहेनतीने केलेलं देणं अथवा विकणं हे मला फारच अशक्य आहे / होत.
माझ्या साऱखीचा जर हा अनुभव असेल तर जे शेतात मोलमजुरी करून, कापसाचं पीक घेऊन, त्याच सूत कातून, विणून, रंगवून, एक / अनेक कलाकृती तय्यार करतात उदर निर्वाहासाठी, त्याचा आपण सखोल विचार करणे अतिशय आवश्यक आहे, नाही का? त्यांचं पोट आहे त्यावर. प्रचंड मेहेनत, कष्ट, वेळ, पैसा, निसर्गावर अवलंबून ई. आणि त्यानंतर विक्रीची अनिश्चितता. मंडळी हे सगळं आपले शेतकरी बंधू भगिनी अविरत अनेक पिढ्या करत आहेत आपले पर्यावरण सांभाळण्यासाठी, वाचविण्यासाठीच आणि आपल्या पुढील पिढीसाठी सुद्धा. मग आपण त्यांना किंचितसा हातभार लावावा ना, चला तर मग.
मी अनेकदा ऐकलं आहे, जो आपल्या स्वतः साठी पाणी भरतो, पाण्याची बदली भरून दुरून आणतो, किंवा विहिरीतून काढून मग वापरतो, तो पुन्हा कधीच पाणी वाया जाऊ देत नाही, स्वतः पण आणि दुसऱ्यांपण महत्व सांगत राहील.
अगदी माझं पण तस्सेच आहे, मी स्वतः छोट्या प्रमाणात कलेची सेवा केल्यामुळे पट्टाकिनी समजू शकते ह्या कलाकारांची कष्टाची पातळी. म्हणूनच सर्वांना विनंती, एकदा तरी पट्टाकिनी खालील वेबसाईट ला भेट द्या, त्यांचं कार्य जाणून घ्या आणि काही शंका असतील / मदत करायची असेल तर बिनधास्त अनघा बालाजी ला संपर्क करा. धन्यवाद.
https://ecotattva.com/about/
बुधवार, २१ जुलै, २०२१
हस्तकला
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा