अनेक पिढ्या आधी, अनेक काळ आधी श्री रामदास स्वामींनी अगदी सोप्प्या शब्दात "मनाचे श्लोक" शब्दबद्ध केले. त्यातला एक फारच महत्वाचा श्लोक म्हणजे
"वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥
आम्हाला शाळेत श्री रामदास स्वामींची नव्याने ओळख झाली आणि तेव्हा पासून मला तरी भरलेलं ताट हातात आलं कि आपोआप मनात हा श्लोक सुरु होतोच, काहीही करावं लागत नाहीच. कारण जेवण करणं म्हणजे फक्त "उदर भरण नाही" तर तो एक यज्ञ आहे. मग अर्थातच हा श्लोक मी माझ्या मुलांना शिकवला लहानपणी, पण ते इंग्लिश मध्यम शाळेतले विद्यार्थी असल्यामुळे त्यांना शाळेत हाच मतितार्थ असलेला पण इंग्लिश श्लोक शिकवला. असो, हरकत नाही.
काल परवाच सन्माननीय BK शिवानी दीदींचे एक महत्वाचे वाक्य वाचण्यात आले. आणि ते मनाला फारच भावले. त्या म्हणतात, हे जे भरलं ताट आपल्या समोर आलंय, ज्या शेतकऱ्यांमुळे आलं आहे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला पोटभर दररोज भोजन मिळू दे, ते कधीही उपाशी झोपू नयेत, अशी जर सर्वांनी "ठरवून सुरवातीला" आणि मग नकळत प्रार्थना केली तर सर्वच जण भरल्या पोटाने अंथरुणावर पहुडतील दररोज. देशाची पण भरभराट होईल अप्रत्यक्षपणे, सुधारेल / इकॉनॉमी वाढेल ई.
अगदी तस्सेच आपल्याला अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागण्याकरता आपली चादर, पांघरूण, ब्लॅंकेट ई. फार फार मदत करतात, नकळत. त्यामुळे आजपासून त्यांना पण धन्यवाद देऊ यात. म्हणजेच जो शेतकरी अगदी त्या कापसाची शेती करतो, कापूस तय्यार झाल्यापासून ते चादर / चादरी तय्यार करून आपल्या पर्यंत पोचवतो त्या सर्व कष्टकऱ्यांना मनापासून नमन. ती उब अनुभवयाला दिल्या बद्दल शतशः धन्यवाद. चादरीं सोबतच आपण परिधान करतो ते प्रत्येक प्रकारचे वस्त्र, दुपारच्या वामकुक्षीकारीता सारलेले पडदे, घराचे सौंदर्य खुलविण्याकरिता वापरलेले सोफाचे कव्हर आणि असे असन्ख वस्त्र प्रकार पण हे कष्टकरी हात देतात. चला तर मग ह्या सगळ्या कष्टकऱ्यांबद्दल अजून जाणून घेऊ या माझ्या सखी कडून अनघा बालाजी कडून. तिच्या वेबसाइट वर तुम्हाला अजून भरपूर माहिती मिळेल. Kindly visit https://ecotattva.com/about/ I will appreciate that.
#Cotton #Ecotattva #Farmers #Bedsheets #Cloths #Cotton-processing #Anagha-Balaji #Respect #Gratitude
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा