मी बहुतेक गम्मत म्हणून, बदल म्हणून ९-१० वीत माझ्या वाहिनीचे सलवार कमीज सहज घातले होते. पण त्यानंतर लगेचच मी polytechnic कॉलेज ला प्रवेश घेतला आणि त्यामुळे सलवार कमीज घालणं सुरूच झालं सतत, रोज. त्यावेळी इतकी आज सारखी पॅन्ट ची फॅशन नव्हतीच. असो. तेव्हा नाही काही वाटलं आणि सलवारचा नाडा हा नगण्य होता माझ्या साठी. कधीच त्या वस्तू कडे विशेष लक्ष गेलं नाहीच. तो असतोच, आणि वापरावा लागतोच एवढंच माहित होत, वापरला जात होता. पण त्यानंतर एस्पेशिअली माझी पिल्लं झाल्यावर का कुणास ठाऊक पण तोच नगण्य नाडा माझ्या डोक्यात जाऊ लागला, काहीही कारण नाही. इतका कि मी त्याला माझ्या आयुष्यातून काढून टाकले नेहेमीसाठी. पण त्यावेळी का कुणास ठाऊक पण माझ्या दर्जी ला माझं मत पटत नसे. तो फार आढे वेढे घेऊन तय्यार होत असे नाड्या ऐवजी इलॅस्टिक वापरण्याकरीता. देवा, लढाई असे ती, प्रत्येक वेळी. जास्त पैसे घेत असे तो, पण मी फार समाधानी राहू लागले त्या छोट्याश्या बदलामुळे. फारच भावला मला तो पिटुकला बदल.
आज हे सगळं साग्रसंगीत का मांडलंय विचारात मंडळी, सांगते.
सध्या माझा एक पाय सरळ स्थितीत ठेवायला सांगितलं आहे अजून काही दिवस डॉक्टरांनी, त्यामुळे नेहेमीचे स्लॅक्स परिधान करण्यास मला प्रचंड अडचण येत होती. विजार / कुर्त्याबरोबर घालण्याची पॅन्ट असे मोजकेच ड्रेस होते, मग ऑनलाईन मागवले काही. आणि सगळेच्या सगळे आले कि इलॅस्टिक सोबत, नाडा नाही. बापरे काय मज्जा वाटली मला. म्हणजे आता हि गरज कमी फॅशन जास्त झाली आहे कदाचित, किंवा वापरायला इतकं सोप्प कि बघा सगळ्यांना आवडले आहेत,म्हणून तर इतके सहजी उपलब्ध आहेत ना साध्या ऑनलाईन वेबसाईट वर पण.
ते साधे पण नवीन ड्रेसेस इलॅस्टिक असलेली पॅन्ट सहित बघून इतका आनंद झाला ना, म्हटलं आताच लिहावं आणि त्या माझ्या टेलर ला नेऊन दाखवावंच, बघ माझी दूरदृष्टी. असो.
#Elastic #Importance-of-elastic #Salwar-with-elastic #Indian-dress-pant #Ease #Comfort
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा