आज मी पुन्हा एकदा वेब एक्स नावाच्या प्लॅटफॉर्म वर जात होते एक मिटिंग अटेंड करायची होती. पण कदाचित इंटरनेट मुळे असेल थोडा वेळ लागत होता. त्यामुळे माझ्या चार डोळ्यांनी काही गोष्टी टिपल्या पटापट आणि माझं मलाच भलतंच आश्चर्य वाटलं. जेव्हा कुठलीही मिटिंग / सभा छोटी असो वा मोठी असते तेव्हा काय काय लागत आपल्याला, जितकी मंडळी अपेक्षित आहेत तितक्या छान मांडून ठेवलेल्या खुर्च्या, पुसलेला फळा, पाणी, आणि बरंच काही. हे कुठली सभा आहे ह्यावर अवलंबून आहे. बरोबर कि नाही?
ह्या वेब एक्स वर म्हणजे ऑनलाईन मिटिंग / सभा मला जॉईन करायची होती आणि जेव्हा मी जॉईन बटण दाबल्यावर वाट बघत होते तेव्हा एका पाठोपाठ एक सुंदर, योग्य, साजेश्या शब्दात काही मेसेजेस येत होते, "आम्ही खुर्च्या आणतो आहे", "फळा तय्यार करतो आहे", "मिटिंग ची तय्यारी सुरु आहे" ई. बाप रे, काय भन्नाट कल्पना आहे. धन्य आहे ज्यांना हि कल्पना सुचली. फारच अप्रतिम. मी पुन्हा एकदा निशब्द झाले अक्षरश:. अगदी मी ह्या आधी जितक्या मिटिंग ची तय्यारी केली होती नॉर्मल दिवसात, माझ्या कॉलेज च्या दिवसात, माझ्या मुलांच्या शाळेत (APJ येणार होते तेव्हा खूप मदत करता आली मला शाळेत खुर्च्या लावायला) , ई. सगळं म्हणजे सगळं डोळ्यासमोर उभं ठाकलं. मी ते दिवस जगले पुन्हा एकदा आज, खूप खूप छान वेळ गेला, खूप दिवस जुन्या आठवणीत गेले, मी सगळ्या ठिकाणांना जसे कि जाऊन आले.
थोडासा कनेक्ट व्हायला जरी वेळ लागला तरी पण कोणीही नाराज होणार नाही असे अप्रतिम विचारपूर्वक मेसेजेस वाचले कि, उलट फारच ऊर्जेने सभेत भाग घेणार. ह्याला काय म्हणायचं मंडळी, मानसशास्त्र?. एखादा माणसं खूप जवळून ओळखणारा किंवा मानसशास्त्र जाणणारा व्यक्ती असेल ज्याने हे लिहिलं असेल आणि ते ताबडतोब वेब एक्स ने ते मान्य केलं आणि दाखवलं पण. जबरदस्त अनुभव होता म्हटलं चला लिहावं.
#Webex #online-platform #meeting #meeting-preparation #chairs #blackboard #whiteboard #arrangements #readiness-of-meeting #thoughtful-messages #impressive #innovative #new #unique #energetic #psychology #human-nature
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा