सोमवार, २६ जुलै, २०२१

बाळंतपण आणि त्याचे प्रकार

गेले अनेक वर्ष मी आणि माझ्या डिपार्टमेंट हेड ने एक गोष्ट नेहेमी अनुभवली आहे ती हि कि विद्यार्थी त्यांच्या संशोधन प्रकल्पावर काम करतात.  बहुतांशी शेवटच्या टप्प्यात त्यांनी जे काम केलं आहे ते नमूद करून ठेवतात प्रबंध म्हणून, आणि तो विद्यार्थ्यांनी कसाबसा लिहिलेला असतो. त्यांचं शेवटचं सादरीकरण झालं कि ते इन्स्टिटयूट / संस्था सोडून निघून जातात. त्यांचा कोर्स पण पूर्ण झाला असतो. मग काय, ते प्रबंध आणि आम्ही शिक्षक, बसतो त्याच बाळंतपण करत. त्या प्रबंधात लिहिलेल्या महत्वाच्या गोष्टी वेगळ्या काढायच्या, त्या विशिष्ट ढाच्यात मांडायच्या, त्याला पेपर च्या स्वरूपात मांडायचं, योग्य ते जर्नल शोधायचं, पाठपुरावा करायचा, परीक्षकांनी सुचवलेले बदल करायचे ई. बापरे, बाळंतपण हा अगदी चपराख शब्द आहे हि सगळी कामं निस्तरण्यासाठी.

दोन वर्षा पूर्वी माझ्या पायांच्या दुखण्यामुळे आणि सध्या पुन्हा गुढग्यावर धडपडल्यामुळे माझे घरी प्रचंड लाड चालू आहेत, पौष्टिक आहार काय, हातात गरमागरम नवनवीन पदार्थ काय, काळजी काय, फिजिओथेरपी काय, ई. एकंदरीत प्रचंड कौतुक. आज माझ्या फिजिओथेरपी डॉक्टर मन लावून काळजी पूर्वक गुढग्याला इलाज करत होत्या तेव्हा हा विचार माझ्या मनाला शिवला "एका आयुष्यात किती बाळंतपण करायची?" अर्थात नेहेमीच असा प्रश्न पडतो मला.

कौतुक आणि इलाज करून घेणं फारच उपभोगते आहे मी सध्या, कारण दुसरा काही इलाजच नाही ना, पर्याय हो. असो. ह्या दोन्ही निमित्याने मला बाळंतपण ह्या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ समजले / उमजले ते हि नसे थोडके.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...