एक घराची गोष्ट, त्यात एक आबा आहेत, त्यांच्या घराचं दार सदोदित उघड, टीव्ही सतत चालूच आणि दिवा पंखा पण. एका ठराविक जागी ३-४ पुडाचा जेवणाचा डब्बा ठेवलेला दिसतो. हे आबा इकडे तिकडे, कधी दारात, कधी पलंगावर पहुडलेले, कधी फाटकाजवळ पहारेकऱ्या सारखे उभे, ई. अनेक दिवस / महिने / वर्ष मी त्यांना एकटेच बघितले आहे. थोडीशी चौकशी केल्यावर समजलं कि ते एकटे नाहीत, त्यांचं अख्ख भरलं कुटुंब आहे, बायको आहे, मुलं सुना नातवंड ई. हे आबा असतील ९० च्या आसपास. बाकीची घरची मंडळी अगदी ३-४ प्लॉट्स सोडूनच राहतात. आबांनी स्वतः म्हणे सांगितलं आहे, मला रोजचा दोनदा डब्बा आणून द्या, माझा स्वभाव चांगला नाही, उगाच कोणालाच त्रास नको. मी येथे एकटाच बरा. जबरदस्त च. नाही का?. देवा, हिम्मत लागते प्रचंड एकटं राहायचं म्हणजे, इतकं सोप्प नाही ते, घर खायला उठत. टीव्ही बघून बघून किती बघणार पण तरी देखील हा निर्णय आणि तो ते इतके दिवस / महिने / वर्ष सातत्याने निभावतात आहे म्हणजे काय म्हणावं त्यांना. मी तर निःशब्दच झाले. माझा त्या आबांशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाहीच, पण जे बघितलं आणि ऐकलं ते नवल आणि अनोखं आहे ह्यात वादच नाही. धन्य ते आबा. सहसा नाहीतर फक्त ढवळाढवळ करणारीच मंडळी दिसतात आणि "मी च बरोबर" हा एक नारा असतोच. येथे तर ३६० अंश वेगळं आहे आणि त्यात ते आबा जास्त काय, न-शिकलेलेच दिसतात मला. म्हणजे शिक्षणाचा आणि इतरांशी वागण्याचा काहीही संबंध नाही हे सिद्ध झालं ह्या उदाहरणावरून.
सोमवार, २६ जुलै, २०२१
एक असेही आबा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा