कोणे एके काळी आपापसातच लग्न जुळत होती, ह्याच्या त्याच्या नात्यातले ई. मग ओळखीने विवाह होऊ लागले. तो वर सगळं ठीक होत कारण एकत्र कुटुंब पद्धती होती, बहुतांशी एकाच गावात / शहरात पिढ्यानुपिढ्या राहणं होत असे. मग जग बदललं. नोकरी मुळे, व्यवसायामुळे, विविध शिक्षणाच्या संधी मुळे विविध ठिकाणी, वेगवेगळ्या शहरात / देशात भ्रमंती सुरु झाली. अर्थातच त्याच वेळी नेमकी टेकनॉलॉजि विकसित झाली आणि त्यामुळे लग्न ठरवण्यासाठी संगणकाचा सर्रास उपयोग होऊ लागला. भरमसाठ उपयोग, विविध प्रकारे, मुलामुलीने स्वतः जोडीदार शोधणे, पालकांनी शोधणे आणि संगणकाने सुचवणे देखील. हा एक अविभाज्य घटक झाला आणि तो मान्य देखील झाला सर्वत्र. असो.
आधी फक्त ढोबळमानाने काही सहज सोप्प्या गोष्टी जुळवून बघितल्या जायच्या. मग हळूहळू अपेक्षा आणि जुळवाजुळव ह्यांची यादी प्रचंड मोठी झाली आणि तदनंतर तर फक्त भौतिक / शारीरिक / दृश्य हे मोजमाप काही अंशी शिल्लक राहील. जास्त भर स्वभाव, अदृश्य आणि सहज न कळणाऱ्या गुणधर्माना दिला गेला. त्यामुळे AI अर्थात कृत्रिम बुद्धिमतेचा वापर वाढला. हे सगळं कमी होत कि काय, त्यात "न्यू नॉर्मल" दिवस सुरु झाले अचानक आणि आज तर मी उडालेच एक बातमी वाचून. आता म्हणे भावी / होऊ घातलेले मुलं मुली प्रकर्षाने अश्या सगळ्या लग्न जुळवणाऱ्या किवा जोडीदार सुचवणाऱ्या संकेत स्थळावर "मी दोन्ही लसी घेतल्या बरं का..." असे काहीसे टाकत आहेत म्हणे. देवा. ऐकावं ते नवलंच.
आता प्रत्येक मोठा व्यक्ती स्वतःच्या सुरक्षितते साठी लस घेणारच ना, आणि त्यात बहुतांशी सगळ्याच कंपन्या / ऑफिसेस आता हे लस घेणं अनिवार्य करत आहेत. मग त्यात सांगण्या सारखं काय आणि ते हि अश्या संकेत स्थळावर? मला तर तो लेख वाचून देखील फार समजलं नाही, म्हटलं असो. नको तेथे माझा छोटासा मेंदू कशाला वापरू मी. असो, कोणाचं काय तर कोणाचं काय. वेगळंच / भलतंच / आकलना पलीकडले.
सोमवार, २६ जुलै, २०२१
कोणाचं काय तर कोणाचं काय
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा