सोमवार, २६ जुलै, २०२१

लिखाण, मी आणि प्रश्नोत्तर

हैद्राबाद मधल्या महाराष्ट्रीयन लोकांचा एक फेसबुक वर समुदाय आहे, अनेक वर्षांपासून. आणि मी अगदी सुरवाती पासूनच त्या वर आहे, जोडली गेली आहे. अर्थात मी फक्त वाचक आहे, काय काय घडामोडी होतात ते टिपत राहते. पण एवढ्यातच माझ्या मनाला एक छोटासा विचार शिवून गेला आणि मी ताबडतोब त्या समुदायाच्या प्रशासकाला / प्रमुखाला रितसर विचारले. माझ्या हातून जे लिखाण होत ते ह्या ग्रुप वर प्रसिद्ध केलं, ह्या ग्रुप च्या मेम्बर्स समोर मांडलं तर चालेल का?, आणि ताबडतोब हिरवा कंदील मिळाला मला. अर्थातच मी आधी काही लेखाचे / कथांचे नमुने पाठवले आणि मग परवानगी मागितली. पण तरीही मला अजून एक प्रश्न पडलाच आणि तो म्हणजे ह्या समुदायाचे नियम. "मी किती लेख ह्या ग्रुप वर पोस्ट करू शकते?", उत्तर:"महिन्यातून दोन". उत्तम झालं सगळं आधीच विचारलं. मग मला यक्ष प्रश्न पडला, आता कसं करायचं, कारण माझे तर भरपूर लेख आहेत, अनुकथा आहेत, इतक्या सगळ्या कश्या सादर करायच्या?

हा विचार करून मी कधी त्या झोपेच्या स्वाधीन झाले माझं मलाच समजलं नाही. आणि मध्यरात्री कधी तरी कोणी तरी माझ्या समोर अक्षरश: अप्रतिम सुंदर सोप्पा उपाय मांडला. महिन्यातून दोनदा परवानगी आहे ना अनुकथा कथन करायची, मग पुढील महिन्यापासून १-१५ तारखेपर्यंत जे लेख / कथा सुचतील / लिहिल्या जातील त्या एक पोस्ट म्हणून प्रस्तुत करायच्या आणि १६-३०/३१ पर्यंतच्या दुसरी पोस्ट म्हणून, झालं, किती सहज तो उपाय मला दिसला.

हे साधे शब्द त्याचेच, लिहिणारा तोच, शब्दांची मांडणी करणारा तोच, विषय सुचविणारा तोच, यौग्य वेळ आल्यावर मगच अश्या समुदायावर जाण्यास सांगणारा तोच, आणि आता मार्ग / उपाय सुचवणारा देखील तोच. अशी ज्याची कृपा मग कशाला प्रश्न चिन्ह आणि विवंचना. दिसतो मार्ग नेहेमीच. "श्रद्धा आणि सबुरी", एवढी ठेवली कि झालं. बास. "त्याची" कृपा असणं म्हणजे दुसरं तिसरं काय हो? 


कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा ।
बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ।
करोमि यद्यत्सकलं परस्मै ।
नारायणयेति समर्पयामि ॥


२ टिप्पण्या:

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...