शनिवार, २४ जुलै, २०२१

पेट्रोल पंप आणि रिफील

मी अगदी लहानपणी पासून बाबांच्या खास व्हेस्पा वर अनेकदा पेट्रोल पंपावर जात असे, त्यानंतर त्यांच्या गाडीतून, मग ऑफिसची बस आणि बहुतांशी प्रत्येक फेरीत मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. खूप लोक पेट्रोल पंपावर रिकाम्या बाटल्या किंवा कॅन घेऊन येत असतात सुट्ट पेट्रोल नेण्याकरिता. कदाचित कोणाची गाडी / ऑटो रस्त्यात अचानक बंद पडला असेल त्यामुळे तात्पुरती सोया म्हणून हे प्रकार. म्हणजे त्या बंद पडलेल्या गाडीला जवळपासच्या पंपापर्यंत पोचायला आधार. पण खरं ते नियमात बसत नाही, कायद्यात पण बसत नाही, पण काय करणार, दोघे हि तय्यार असतात, तो पंप वाला आणि मागणारे पण. मागणी आणि पुरवठा असल्यामुळे हे धोकादायक काम अविरत सुरु आहेच. पण आता मला एक सांगा मंडळी, काही वर्षांपूर्वी गॅस वर चालणाऱ्या गाड्या आल्या आणि त्याचा आता सुळसुळाट झाला आहे. तो गॅस भरण्याचं जे नोझल असत ते इतकं वेगळं आणि बारीक असत, त्याची भरण्याची पद्धत पण वेगळीच, मग आता सांगा हा गॅस कसा काय पाण्याच्या बाटलीत किंवा कॅन मधे भरून नेणार? अजून तरी अशी काही सोय किंवा जुगाड निघालाय हे मला माहित नाही. निघेल कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून.

परवा एका दिवसात ओला कंपनीची विजेवर चालणारी गाडी लाँच झाली आणि लाखापेक्षा जास्त गाड्याचं बुकिंग झालं देखील. त्यातले आम्ही पण एक आहोत, मुलांसाठी बुक केली एक गाडी.

माझ्या दृष्टीकोनातून आता चालकाला फारच सतर्क / जागरूक राहावं लागणार, अश्या विजेवर किंवा गॅस वर चालणाऱ्या हलक्या फुलक्या गाड्या मधे दोन इंधनाचा पर्याय नाही. त्यामुळे किती चालवली, किती इंधन आहे शिल्लक, कुठे जायचं आहे, इत्यादींची शिस्त अंगी बाळगावी लागणारच, काहीही दुसरा पर्याय नाहीच.

सहज आठवलं मला, अभियांत्रिकी विद्यार्थी होते तेव्हा आणि शिकवायला लागले तेव्हा मला सोमवार ते शनिवार घरून कॉलेज ला जावं लागे. शनिवारी कॉलेज संपल कि आधी पेट्रोल पंप गाठायचा, टाकी फुल्ल करायची आणि मगच घरी पाऊल टाकायचे, म्हणजे सोमवारी एकदा गाडी सुरु केली कि ती कॉलेज मधेच थांबणार. अशी माझी मी ठरवलेली रोजनिशी होती. त्यामुळे पेट्रोल मुळे गाडी बंद कशी काय पडू शकते हा मला पडलेला यक्ष प्रश्न. असो.  

#Petrol #Refill #illegal #discipline #electric-vehicle #gas-vehicles #self-discipline 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...