शनिवार, १७ जुलै, २०२१

सोफा ने चहा चाखला

माझ्या सोफ्याला पण आज चहा हवा होता बहुतेक, पिला कि पठ्याने, अगदी गरमागरम असाच.

अहो आज एकाच वेळी दोन गोष्टी करत होते, जरा कप धरताना, बिस्कीट हातात घेतांना डिचमळला आणि ओम नमः शिवाय, सांडला चहा माझ्या हातून. असं म्हणण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने म्हणायला आवडतं मला.  नेहेमीच.

मी लहान होते त्यामुळे माझ्या जर कपड्यांवर काही सांडलं तर मला ते अजिबात आवडत नसे, माझ्या साठी आणि त्या कपड्यासाठी पण फा$$$$र वाईट वाटायचं मला. बास मग काय रडू यायचं. ते बघून मग माझ्या बाबांनी तेव्हा एक अगदी पिटुकली युक्ती शोधून काढली. अर्थात सर्वच आई-वडील हे करत असतीलच, पण माझ्या साठी ते फक्त माझे बाबाचं करायचे, असं होत काहीस. सांडलवंड झाली कि ताबडतोब बाबा म्हणायचे कसे, "अरे वा वा, आज तुझ्या बरोबर फ्रॉकला पण खाऊ घातलं वाटतं?" आणि मग मोठ्याने दोघात हशा पिकायचा. मी कमी होते का, कधी कधी त्यांच्या हातून पण सांडायचं शर्टवर तर मी पण मग तसेच म्हणायचे. असं चालायचं आमच्या दोघांचं काहीबाही. आज त्या पिटुकल्या आठवणी पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. मी माझ्या मुलांना लहानपणी पण असेच सांगितले होते आणि आज पण सांगते गरज पडल्यास.

चहा ऐवी तैवी सांडलाच होता थोडा, मग आधी हातातला उरलेला चहा बिस्कीट चा आनंद घेण्याला मी प्राधान्य दिलं, मग साफसफाई केली. मज्जा आली, बाबांची पुन्हा एकदा प्रकर्षाने आठवण झाली. 

#Tea #Memories #Tea-spilled #Dad-memories #SofaLovedTea #Tiny-Memories #Dads-The-Great #Positive-Approach #No-Cry

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...