शनिवार, १७ जुलै, २०२१

हुबेहूब प्रतिकृती

मी जरी शिक्षण क्षेत्रातच नोकरी करते तरी देखील माझी मुलं लहान असतांना त्यांच्या शाळेच्या सुट्टया आणि माझ्या सुट्ट्या अनेकदा जुळून येत नसत. त्यामुळे मग मी ऑफिसला जाताना आणि ते घरी असल्यावर मला काहीतरी उपक्रम / activities ठरवाव्या लागायच्या, समजावून सांगाव्या लागायच्या. तो एक मोठा कार्यक्रमच असायचा. पण माझी शहाणी मुलं ऐकायची. असेच एकदा वर्तमान पत्र चाळतांना R K लक्ष्मण ह्याचा अप्रतिम फोटो किंबहुना कार्टून आलं होत. त्यात आधीचे आणि अत्याधुनिक असे लक्ष्मण सर हातात TOI घेतलेले दाखवले होते. बास, त्या दिवशी मग तेच काढून ठेवा मी ऑफिस ला जावून येते तो पर्यंत, असं सांगितलं. "हो मम्मा" म्हटले आणि लागले कामाला. माझ्या गाडीची आतुरतेने वाट बघत दोघे हातात आपआपले अप्रतिम चित्र घेऊन उभे होते, दारात संध्याकाळी. आत्ता पण माझ्या डोळ्यात पाणी उभं राहील आहे ते सगळं आठवून. माझी मुलं म्हणून नाही पण त्यांच्या वयाच्या मानानी  भन्नाट च काढली होती दोन्ही चित्रे. आणि दोन्ही त्यांच्या पद्धतीने, वेगळी अशी, हुबेहूब पेक्षा पलीकडची.

काल वर्तमानपत्रात एका इन्शुरन्स कंपनीची जाहिरात होती त्यात एक छोटीशी कन्यका हातात रंगबिरंगी छत्री, बूट, केश / वेशभूषा भन्नाट अशी केलेली, गेले काही दिवस झोमॅटो ची ती लाल गाडी + माणूस + टोपी ई. ची जाहिरात झळकते आहे, आणि अश्या अनेक जाहिराती कदाचित रविवार म्हणून अनेक वर्तमानपत्रात दिसल्या आणि हे सगळं आठवलं. आज माझी लेकरं लहान असती तर त्यांना हे सगळं म्हणजे सगळं काढायला सांगितलं असत मी, त्यांनी काढलं पण असत आणि ते हुबेहूब काय त्यात त्याची दोघांची कलात्मक भर पण पडली असती. आज अर्थातच त्यांचं वाढलेलं वय, डोंगराएवढा अभ्यास आणि शर्यत ह्या सगळ्यांमुळे मला सांगणं योग्य वाटत नाही, पण लिहायला, आठवणीत रममाण होण्याकरता तर काही अडसर नाही ना, मग बास, माझ्या करता तेच पुरेसं आहे. ते दोघे एकदा स्थिरस्थावर झाले कि मग किंवा अधेमधे विरंगुळा / बदल म्हणून त्यांची आवड + कला त्यांनी जोपासावी हि अपेक्षा आणि प्रतीक्षा पण त्यांच्या अजून कलात्मक गोष्टी बघण्याची. 

सुदैवाने दोघांमधे एक स्पर्धा / चुरस असायची त्यावेळी लहानपणी, वेळेआधी संपवणे हे ध्येय असायचे, त्याकरता असंख्य वेळा घड्याळ बघितलं जायचं, उत्कृष्टच काढण्याचा प्रयन्त असायचा, ऐकायचे, नवीन काहीतरी करायला मिळाल्याचं समाधान असायचं..... आई ग, हि यादी फारच मोठी आहे माझ्यासाठी. फारच हृदयस्पर्शी आठवणी, अगदी नगण्य पण मौलिक फक्त माझ्यासाठी.  Love you V n V.

#AwesomeMemories #Memories #Drawing #ExactCopyOfDrawing #EngagingActivity #WholeDayActivity #HolidayActivity #Art #UniqueArt #BlessedKids


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...