माझ्या लहानपणी मैदानी खेळ, प्रत्यक्ष गप्पा, एकमेकांशी भेट, भरपूर हसणं ई. वर जास्त भर होता कारण आजकाल सारखी स्क्रीन / काचेचा-पडदा सहजी उपलब्ध नव्हताच कुठेच. त्याच प्रकारात मग चित्रपट गृहात जाऊन चित्रपट बघणे हि भली-मोठी पर्वणीच होती. का? सांगते. "वॉशिंग पावडर निरमा" ह्या उत्पादनाची जाहिरात टीव्ही वर फक्त काही सेकंद दाखवायचे. त्यात फार कमी टीव्ही होते तेव्हा आणि त्यात फक्त दूरदर्शन हे एकच चॅनेल / वाहिनी. देवा. त्याच्यामुळे आम्हाला "ती" काही मिनिटांची$$$$ निरामाची जाहिरात बघण्यात सगळ्यात जास्त इंटरेस्ट, भल्यामोठ्या पडद्यावर. अजून एक उत्सुकता म्हणजे तिकिटाच्या रांगेत लागून तिकीट मिळवणे, थेटर मधे प्रवेश केल्यावर भल्यामोठ्या आकाराचे पोस्टर्स बघणे ज्यात संपूर्ण गोष्ट चित्रित केली असायची, ते भव्य दिव्य महागडे स्वप्नातीत पोशाख आणि बाकी सगळ्या गोष्टी बघून तो चित्रपट काय असेल हे इमॅजिन करणे ई. जगावेगळी अनुभूती असायची ती.
मग चित्रपट सुरु व्हायचा, संपूर्ण पैसा वसूल पापणी न हलवता बघायचा, मध्यंतर कधी व्हायचं समजायचं देखील नाही, आणि मग समोस्यांचा फडशा पडायचा. बाप रे, मज्जेच्या पुढची पायरी होती ती. मग चित्रपट संपला कि त्या आठवणीत घरी परत, आणि त्याच आठवणीत रममाण काही पुढचे दिवस. अश्या सगळ्यांसाठी जायचं चित्रपट बघायला, अर्थात कधी कधी.
सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे माझ्या शेजारची मैत्रीण, तिची आजी, अतिउत्साही. आम्हा जवळपास ६-७ जणींना चित्रपट, प्रदर्शनी आणि इतर ठिकाणी घेऊन जायची तय्यारी त्यांचीच. त्याच पुढाकार घ्यायच्या. मग काय आम्ही तर एका पायावर तय्यार. आई बाबा पण काही म्हणायचे नाही कारण भरभक्कम सोबत असायची. वा.
आज वर्तमान पत्रात एक छायाचित्र आले आहे, एक नवीन उद्यान सुरु होत आहे पुण्यात, भले मोठे डायनोसार दिसत आहेत. ते बघून माझी मुलं विचारतात कशी "मम्मा तू बघितलास का हा चित्रपट डायनोसारचा?" आणि ह्या सगळ्या चर्चेला उधाण आलं, आठवणी जाग्या झाल्या. माझ्या लहानपणीचा एक चित्रपटच जणू पुन्हा डोळ्यासमोर उभा ठाकला.
#Movie #MovieExperience #MyChildhoodMemories #TicketsFromWindow #Samosa #HugeBanners #ACHall #Dinosar #Grandma #AwesomeExperience
लहान लहान घटना आठवणींवर लिहिण्याचा तुमचा हा उपक्रम खरंच खूप स्तुत्य आहे आणि तो इतरांना प्रोत्साहन देणारा आहे. असेच लिखाण चालू राहू द्या अविरत. हार्दिक शुभेच्छा !!
उत्तर द्याहटवाधन्यवाद, हो नक्की, असेच लिखाण चालू ठेवण्याचा मानस आहे.
उत्तर द्याहटवा