फेसबुक वर स्टोरी टेक्स्ट लिहितांना बॅकग्राऊंड पण आपण ठरवू शकतो, आपल्याला हवा तस्सा, आपल्या गोष्टीला साजेसा. मला फार आवडतं नेहेमीच असे विविध बॅकग्राऊंड वापरायला. ते नीट लक्षात ठेवलेलं दिसतंय फेसबुक ने. मला लिहिण्याचं प्रोत्साहन देण्याकरता फेसबुक ने आज किती सुंदर आणि कितीतरी प्रकारचे नवनवीन बॅकग्राऊंड आर्टस् पोस्ट केलेत आज. अहाहा. मी तर वेगळ्या जगात पोचले ताबडतोब ते बघितल्या बघितल्या आणि वापरले देखील. ते विविध रंग, आकृत्या, पॅटर्न्स बघून मला अनेक छोटे नवीन विषय लिहायला आढळले / सापडले / दिसले.
माझ्यासारख्या छोटेखानी लिहिणाऱ्यांना, ते वाचणाऱ्यांना इतकी सुंदर पर्वणी मिळाली फेसबुक मुळे. अप्रतिमच. जेव्हा मी माझे स्टोरी आर्काइव्ह बघितले तर अप्रतिम रांगोळी काढलेली आहे असेच वाटते. धन्यवाद फेसबुक नवनवीन गोष्टी उपलब्ध करून केल्या बद्दल.
#facebook #FacebookStories #fbtextstory #fbbackgrounds #FacebookBackgrounds #inspirational
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा