शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

तुझे माझे नाते अनेक जन्मीचे

" तुझे माझे नाते अनेक जन्मीचे" असं माझी आई तिच्या भजनांमधे म्हणत असे, अर्थातच "त्या" देवाला उद्देशून. मी पण म्हणतेच. पण आज त्याच बरोबर पुन्हा एकदा अजून एका नात्या बद्दल लिहावसं वाटलं.

सध्या ह्या नवीन दिवसात माझा एक मदतनीस धोबी-दादा उपलब्ध नाही. किंबहुना मी सध्या कपडे घरीच इस्त्री करते आहे. मी विद्यार्थिनी असतांना आईकडे देखील रविवारी माझा धोबीघाट असायचा. कारण त्या दिवशी सकाळी सगळे बाहेरचे कपडे धुवायचे हातानी आणि मग इस्त्री. तो एक मोठा कार्यक्रम असायचा. मोठ्याने, अतिउंच आवाजात संपूर्ण इस्त्री होईस्तोवर गाणी लावायची टेप रेकॉर्डरवर आणि भरभर हात चालवायचा.

आता मोबाईल वर गाणी लावली जातात, स्वतःला ऐकू येतील इतक्याच आवाजात आणि दरदिवशी हा प्रयोग होतो. पट्टाकिनी एका ड्रेस ला इस्त्री करून घ्यायची दररोज. कधीतरी करते रविवारी सगळे इस्त्री एकत्र पण सहसा नाहीच.

माझा अजून एक सखा आहे, हिटिंग पॅड. ते चालूकरून मी आपली पाय दुखायला लागले कि शेकत बसते. छान वाटत. हलकं वाटत. काही दिवसांपुर्वी सकाळीच वाटलं शेकावे, तेव्हाच इस्त्री करून झाली होती. एक सहज प्रयोग केला. पायावर चादर घेऊन बंद पण तापलेली इस्त्री फिरवायला सुरवात केली. भन्नाट अनुभव होता तो. कमीतकमी २० मिनिटं पुढे परमानंद उपभोगला मी त्या इस्त्री मुळे. समाधान तर उच्च कोटींचं मिळालं कारण वीज वाया गेली नाही त्या दिवशी आणि त्या दिवशीपासून आताशा रोज १५ मिनिटं माझी असतात, वेगळ्या प्रकारची इस्त्री करण्यासाठी. अहाहा. "प्रयोगातून विज्ञान" ह्या नावाचा विषय उगाच नाही शिकले मी शाळेत.  हे माझे चाळे बघून दोघा मुलांनी कपाळावर हात मारून घेतला, म्हटले तुझं काही खरं नाही मम्मा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...