खूप पूर्वी पासून हट्टा कट्टा तगडा भाऊ बहिणीची रक्षा करत असे किंवा करावी ह्या उद्देशाने रक्षाबंधन हा सण आखला गेला आणि साजरा केला गेला. समुद्र देवता सर्व कोळी बंधूना सांभाळतो, भरपूर देतो म्हणून देखील हि नारळी पौर्णिमा साजरी केली जाते आणि तिला असं नाव देखील दिलं गेलं आहे. आज किंबहुना सध्या काही वर्षांपासून ह्याच सणाचे विविध प्रकार दृष्टीस पडले आणि ते भरपूर आवडले म्हणून म्हटलं लिहावं.
आज माझ्याकडे एक कुटुंब येणार होत. ते म्हणाले आम्ही दुपारी येतो कारण सकाळी राखीचा कार्यक्रम आहे. जे येणार होते ते सुंदर चौकोनी कुटुंब आहे, दोन मुली आणि आई बाबा. माझ्या मनातला प्रश्न ओठातून बाहेर पडायच्या आत उत्तर मिळालंच. दोन्ही मुली त्यांच्या वडिलांना म्हणे राखी बांधतात.
माझ्या ओळखीच्या काही कुटुंबात दोन बहिणी आहेत, तीन बहिणी आहेत त्या आपआपसात एकमेकींना राखी बांधतात ह्या दिवशी.
मी लहान असतांना मागे एकदा लिहिल्या प्रमाणे माझ्या आई बाबांना आणि भावाला विचारत असे कि मीच का राखी बांधायची दादाला? आधी त्याने बांधावी मला. ती जरी गम्मत होती किंवा राखी चे महत्व न कळण्यासारख्या वयात होते त्यामुळे असेल. पण ते आज किती सहज बघायला मिळतंय किंवा कृतीत येतंय. सध्या मी माझ्या मोठ्या भावाला माझ्या कडे येऊन राहायची विनंती करते आहे कारण तो आता एकटा पडला आहे, एकटा राहतो आहे, त्यापेक्षा म्हटलं सगळे गुण्या गोविंदाने राहू. हो म्हणाला. आणि आज राखी म्हणुन मी फोन केला तर म्हणतो कसा, आता तू मला सांभाळणार म्हणजे मी तुला राखी बांधायला हवी.
माझी लेक पण म्हणाली, कि ज्या कुटुंबात भाऊ लहान आणि बहीण मोठी असेल तेथे तर भावानी बहिणीला राखी बांधावी, कारण ती मोठी असल्यामुळे त्याला भरपूर मदत करणार, रक्षा करणार, सतत त्याच्या बरोबर उभी राहणार ई.
बॉर्डर वर काम करणाऱ्या जवानांना काही जणी आवर्जून राखी बांधतात, आज मी एक व्हिडिओ बघितला त्यात ती वॉचमन भैया ला राखी बांधते, असो.
रक्षा करणारा / करणारी मग ती कोणीही असो त्यांच्या सोबत आजचा सण आनंदाने आणि समाधानाने साजरा करू या, वेगळया पद्धतीने ह्या सणाकडे बघुयात, ह्या बंधनाला मान सन्मान देऊया. राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना.
रविवार, २२ ऑगस्ट, २०२१
राखी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा