अनेक दिवस / महिने एक दुकान मी बघत होते आणि ते दुकान देखील मला खुणावत होते. कधी जाणं होत नसे. मी त्या दुकानाबद्दल त्यांच्या वेबसाईट वर बघितलं होत, पण प्रत्यक्षात जाणं झालं नव्हतं. जाता-येता रस्त्यावरून फक्त त्याची झलक दिसत असे. त्यावरून दुकांची खोली, रुंदी, लांबी ई. काहीच लक्षात आलं नाही. काही दिवसांपूर्वी एकदाच शेवटी जाणं झालंच त्या दुकानात. किंबहुना दुसरा काहीही पर्याय दिसला नाही मला, त्यामुळे गेलेच. पहिल्यांदा गेले असल्यामुळे आणि उत्सुकतेमुळे माझं सगळं लक्ष दुकानात काय काय असेल ह्याच्या कडे होत आणि मी नेमकी एक्सिट दारातून प्रवेश केला. असो. तेव्हा आत बघितलं तर भलं मोठं दुकान होत आणि भरपूर भरलेलं, प्रचंड व्हरायटी होती. त्या दुकानाची थोडक्यात रचना अशी होती कि रस्ता, नंतर ४ पायऱ्या, दोन दारं आणि आत शिरल्यावर सगळ्या वस्तू, त्या दुकानाच्या मालक आणि त्यांच पैसे घेण्याचं काउंटर दोन दारांच्या मधे. म्हणजेच मालकाची पाठ सतत रस्त्याच्या दिशेला, किंवा प्रवेश दाराच्या दिशेला. माझ्या दृष्टीने हे उलटं असायला हवं खरं तर. एक तर मालकाला दिसायला हवं कोण येतंय जातंय, गाड्या कश्या पार्क केल्या आहेत, किंवा प्रथमदर्शनी स्वागत करण्याकरता ई. दुकानात शिरल्याशिवाय मालकाला कळणार नाहीच कोण आलंय. जेव्हा एखादा बंगला बांधला जातो भारतात, तेव्हा प्रकर्षाने हे बघितलं जातं कि स्वयंपाक घरातून बाहेरच गेट दिसलं पाहिजे. कारण घरातली स्त्री हि बहुतांशी स्वयंपाक घरात असते आणि तिची नजर हवी बाहेर आणि सहज. तसेच इथे पण मला ते जाणवलं. असो. ज्याचं त्याच्या बरोबर. वास्तु शास्त्राप्रमाणे त्यांनी ती रचना केली असेल, कोणास ठाऊक. काही का असेना दुकान चालतंय ना ते महत्वाचं.
शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१
दिशा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा