रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

सोचते रह जाओगे

असं काहीस झालं माझं. मनसुबे फक्त घडवत राहिले मी, तोंडाची वाफ दवडणे म्हणतात ह्याला. मुलांची १२ वी झाली कि मी आईला नेहेमीकरता माझ्या कडे राहायला बोलावणार. मग मेडिकल ची महत्वाची प्रवेश परीक्षा होऊ दे मग तर मी कोणासाठी नाही थांबणार. सगळ्यांना सांगत सुटले, कृती करण दूरच.  आई आली कि मी ६ महिने सुट्टी घेईन, तिची सेवा करेन, एका मावशींना तिला सांभाळण्यासाठी तय्यार करेन, सगळे टीव्ही वर येणार सिरीयल एकत्र एन्जॉय करेन, तिच्या पायांना रोज तेल लावून देईल, ई. फक्त शब्द. आधी आधी नाही म्हणायची, मी नाही येणार, जावयाच्या घरी कसं राहायचं?, पण नंतर हो म्हणाली, मनापासून नव्हतं ते बहुतेक, मला फक्त बरं वाटावं म्हणून. बास. शेवटी तिनेच मार्ग काढला ह्यातून. काहीही म्हणजे काहीही करू दिल नाहीच मला. असो. आता फक्त डोळ्यात पाणी उरलं आहे, आयुष्यभराकरता.

ह्यापुढे कधी हि कोणीही कशाचीही वाट बघायची नाहीच, हे च खरं. मनात आलं कि करून टाकायचं. वेळ आणि नशीब कोणासाठी थांबत नाही. फार मोठा आणि भयानक धडा देऊन गेली ती.


1 टिप्पणी:

  1. शेवटी तिनेच मार्ग काढला ह्यातून. काहीही म्हणजे काहीही करू दिल नाहीच मला...extremely touching..
    Aai aaich aste, tichi jaaga kunich gheu shakat nahi..

    उत्तर द्याहटवा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...