पुण्यात वास्तव्याला आल्यापासून गेले अनेक वर्ष मी चितळेंची भली मोठी फॅन आहे. आधी मी तुळशीबागेत गेले कि चितळेंकडून अनेकविध गोष्टी विकत घेत असे. त्या शनिपारच्या दुकानात मोजून वजनावर मिठाई आणि बऱ्याच गोष्टी मिळतात. त्या नंतर काही वर्षांनी माझी थोडी सोय झाली आणि त्यांचच अजुन एक तस्सच दुकान गरवारे पुलाजवळ सुरु झालं. त्याचा हि मी भरपूर फायदा करून घेतला. एक तर भरलेलं घर, खाणारी माणसं आणि आवड.
हळूहळू अनेक ठिकाणी दुकानं सुरु झाली आणि अगदी माझ्या घराजवळ पण दोन दुकानं आली. माझी अजूनच सोय झाली. प्रत्येक वेळी ह्या नवीन दुकानात पाऊल टाकलं कि काहीतरी नवीन दृष्टीपथात पडतच आणि त्यामुळे मला तर खूप आवडतं अधेमधें ह्या दुकानांमधे जायला.
भरीसभर माझ्या ऑफिस च्या रस्त्यावर मला नवीन दुकान उघडलेलं दिसलं आणि "सोन्याहून पिवळं" च झाल्यासारखं वाटलं मला. अर्थात त्या दुकानाचं नाव एक्सप्रेस असं होत. ते काय आहे हे मला बाहेरून समजत नव्हतं. एक दिवशी गेले तर चाट पडले मी कारण त्या दुकानात आधी सारखं हे पाव द्या, ते अर्धा किलो असं काहीच नव्हतं. सगळं म्हणजे सगळं आधीच पॅक करून ठेवलेलं. बघा, उचला, पैसे द्या आणि फटाफट बाहेर पडा = एक्सप्रेस. अहाहा. आवडलं मला हे फारच. उगाच वेळ दवडायला नकोच सर्वांचाच हो, दुकानदाराचा, गिऱ्हाईकाचा आणि तो जो हे पदार्थ तय्यार करतो त्याचा. सगळं केलं कि पाकिटात थेट. ने-आण सोप्प अगदी. इतकी सुंदर कल्पना कदाचित त्यांना थोडसं संशोधन केल्यामुळे सुचली असावी असा माझा अंदाज आहे. हा प्रवास ठराविक टिपिकल मिठाई दुकान ते अनेक दुकाने ते एक्सप्रेस ते संपूर्ण दिवस सुरु राहणे हे फारच कौतुकास्पद आहे आणि संशोधनात्मक असंच.
सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१
तीन तऱ्हेची दुकानं
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा