शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

फारच सुक्ष्म निरीक्षण

आज श्रावण शुक्रवार. माझी आई सुद्धा आता आत्ता पर्यंत जिवती ची पूजा करून मला पण ओवाळत असे. तेच मी देखील पुढे चालू ठेवलं आहे. माझ्या दोघांना ओवाळणे. आज जरा मी कन्यकेला सगळी तय्यारी, पुजा, औक्षवणाची तय्यारी ई. करायला सांगितली. आणि तिने केली देखील. पुरण होणं राहील होत, बाकी सगळी तय्यारी झाली होती. मी पुरणाचे दिवे केले आणि तूप घालून वात वगैरे लावण्यासाठी जेव्हा तबक उचलले तेव्हा बघते तर काय त्या औक्षवणाच्या तबकाखाली अक्षता होत्या. माझ्या नजरेस पडल्या. बाप रे, टच किनी पाणी आलाच आपोआप माझ्या डोळ्यात. औक्षवण झाल्यावर तबक तसेच खाली जमिनीवर ठेवायचे नाही हे लेकीने किती शिताफीने हेरलं हे माझ्या लक्षात आलं आणि ते तिने हेरलच नाही तर अमलात आणलं देखील, अर्थात आधी, पण असो.  वा वा, अप्रतिम. अशीच निरीक्षणाची शक्ती तिला सतत लाभो हि प्रार्थना.

माझ्या आईने कधीही मला सांगितले नाही एखाद्या पदार्थात काय काय घालायचं ते. ती म्हणायची स्वतः बघ मी करतांना, चव बघ आणि सांग, काही कमी वाटलं तर मी मग सांगते. तेच जेव्हा मी नोकरी करायला सुरवात केली तेव्हा आणि आता माझ्या विद्यार्थ्यांना पण हेच सांगते कि नोकरीच्या पण ठिकाणी स्वतःच निरीक्षण करत शिकत राहावं लागत सतत. नाविन्य पूर्ण विचार करणे, ते कृतीत आणणे ई. फार महत्वाचे, तारुन नेणारे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...